सुस्वागतम...माझ्या या शैक्षणिक ब्लॉगवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे......... WEL-COME ON MY BLOG .......

Wednesday 30 November 2016

आपला आरोग्यमित्र :भाग 2 विषय: ' मणक्याचे आजार '

मणक्याचे आजार ; कारणे  ; उपचार..... 

आजाराची लक्षणे
1हात बधिर होणे, खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत मुग्या येणे.
इत्यादी लक्षणे दिसून येतात. मणक्याचा आजार झालेल्या रुग्णामध्ये कंबरेच्या किंवा मानेच्या मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ कमी झाल्यामुळे दोन मणके हे एकमेकांवर घासल्याने मणक्याची झीज होऊन त्या ठिकाणी गॅप तयार होतो.किंवा मणक्यातील गादी घासली जाते.
त्यामुळे मुंग्या येतात किंवा दुखते
कंबरेत दुखणे,हाता  पायांना मुग्या येणे.
2> सकाळी उठताना त्रास होणे.
3> चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे.
4> पायाच्या मागील बाजूने कंबरेपर्यंत शीर दुखणे.
5> मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे.
6> शौचाला बसता न येणे.
7> चक्कर येणे.
मणक्याचे आजार होण्याची कारणे 
1> डोक्यावर, खांद्यावर किंवा पाठीवर जड वजनाच्या वस्तू उचलणे.
2> खड्डे असलेल्या रस्त्यावरून सतत मोटारसायकलवरून प्रवास करणे.
3> अपघातामुळे मणक्याला इजा होणे, सतत बैठे काम करणे.
4> पोट साफ न होणे, सतत वेदनाशामक औषधी खाणे.
5> स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा.
6> गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे.
7> जेवणामध्ये वातदोष वाढवणारे पदार्थ अधिक असणे उदा. वांगे, बटाटे, हरभरा डाळ, वाटाणे, तळलेले पदार्थ, अति तिखट पदार्थ इ. अनेक कारणांमुळे शरीरात वात दोष वाढून दोन मणक्यातील वंगणासारखा स्निग्ध पदार्थ कमी होऊन मणक्याचे आजार उद‌्भवतात.
8> संकरीत धान्य व फवारलेले धान्य तसेच पालेभाज्या यामुळे हाडांना ठिसूळपणा येतो
मणक्यातील हाडे ठिसूळ होण्याला
अनेक कारणे आहेत. आयुर्वेदामध्ये मणक्यांच्या विकारावर अत्यंत उपयुक्त व स्थायी स्वरूपाचे पंचकर्म उपचार उपलब्ध आहेत. आयुर्वेदातील काही मूलभूत तत्त्वे अंगीकारल्यास मणक्यांचे होऊ घातलेले विकार आपण टाळू शकतो.
बरे होऊ शकतो
आयुर्वेद उपचार
1> सुरुवातीस बरेच दिवस वेदनाशामक औषधी खाऊन रुग्ण आयुर्वेदाकडे येतो. वेदनाशामक औषधींनी तात्पुरते बरे वाटते, परंतु वेदनाशामक औषधी ही काही मणक्याच्या आजाराची परिपूर्ण चिकित्सा नाही.
2> वेदनाशामक औषधी घेणे, शरीराला वजन बांधणे व ऑपरेशन करणे, हा क्रम ठरलेलाच. परंतु आयुर्वेदीय पंचकर्माद्वारे बरीच मणक्याची ऑपरेशन निश्चित टळू शकतात.
पंचकर्मामध्ये : सर्वांग स्नेहन- बॉडी मसाज
सर्वांग स्वेदन- स्टीम बाथ
यामुळे शिरा मोकळ्या होण्यास मदत होते, वात कमी होतो. स्नायूंना आलेला कठीणपणा (stiffness)
नष्ट होऊन ते लवचिक होतात.
बस्ती - वात दोषावरील प्रमुख व खात्रीशीर उपचार मणक्याच्या विकारात प्रामुख्याने तिक्तक्षिर घृत बस्ती, यापन बस्ती, मज्जा बस्ती या बस्ती प्रकारांचा अद‌्भुत लाभ होतो. नियमित वर्षातून एक वेळा वरील बस्ती घेतल्यास व्याधी पुन्हा पुन्हा होत नाही.
कटी बस्ती, मन्या बस्ती - कंबर व मान या प्रदेशी औषधी सिद्ध तेल काही काळ ठेवले जाते. या सर्व बस्ती प्रकारामुळे हाडांची झीज भरून येण्यास मदत होते. मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ तयार होण्यास मदत होते.
पत्रपोटली - या उपचारामध्ये विविध वातशामक औषधी उदा. एरंडपत्र, निर्गुडीपत्र, शिग्रुपत्र, चिंचपत्र इत्यादी पानाची पोटली करून शेक दिला जातो.
नस्य - या उपचारादरम्यान नाकामध्ये औषधी सिद्ध तूप किंवा तेल नाकात सोडले जाते. यामुळे मानेच्या मणक्यांचा गॅप भरून येण्यास मदत होते.
तसेच विविध आयुर्वेदिक उपचार, सुवर्ण कल्प, नैसर्गिक कॅल्शियम कल्प वातनाशक औषधींनी मणक्याच्या आजारावर मात केली जाऊ शकते.
पथ्यापथ्य : काय खावे / काय करावे.स्निग्ध,उष्ण असा आहार.गहू,नाचणी,उडीद,लसूण,आले,एरंड तेलाची चपाती.
योगासन :
भुजंगासन, पादपश्चिमोत्तासन, धनुरासन, सुप्तरासन, पवनमुक्तासन इत्यादी योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी.
प्राणायाम :
अनुलोमीलम15 मीनीट  कपालभाती 15 मीनीट
पथ्य- काय करू नये / काय खाऊ नये.वांगे,बटाटे,हरबरा डाळ,वाटाणे,चवळी,वाल,अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावीत.अति परिश्रमाची कामे टाळावीत,जास्त मोटारसायकल प्रवास टाळावा.आंबट रसामुळे हाडांची व मणक्यातील चकत्यांची झीज लवकर होते.जड वजनाच्या वस्तू उचलू नये.आंबट पदार्थ,दही,चिंच व आम्ल रसाचे विदाही पदार्थ उदा.इडली,ढोकळा,पाव,डोसा बंद करावे.आतापर्यंत अनुभवातून अनेक रुग्णांना आॅरेशनशिवाय गुण देण्यास यश मिळाले आहे.
1)तेल व मसाजव्दारे सांध्यास व खोलवरील स्नायूस  गरम पाण्याच्या पिशवी ने शेक देणे सांध्यातील वेदना घालवणे शक्य आहे
तेल बनवण्याची पद्धत
*मोहरी तेल1000 ml
* एरंड तेल 250 ml
*तीळ तेल  250 ml
* कोरपड 500 gram
* पारीजात चे फुले व पाण 500 gram
* निर्गुडीपत्र,500 gram
* मेथी पावडर 250gram
*आेवा 100gram
*आवळा पावडर  100gram
* 10 लवंग gram
* 100 लसुन  gram
सर्व एकत्र करून
1 तास ऊकळून
घ्या थंड करून
काचेच्या बाटलीत भरुन ठेवा व
कुठल्याही सांधे दुखी व मुका मार मुचकल्यावर
चालेल 
2)गरम पाण्याच्या पिशवी ने शेक देणे
4)पुरक व्यायाम  physiotherapy
या
व्यायाम पद्धती मधे मनक्या संदर्भ व्याधीचे व्यायाम ने  स्नायूसंधींना बल प्राप्त करुन देणारी उपचार पद्धती आहे
व व्याधी परत होवु नये म्हणुन केली जाणारी उपचार व व्यायाम पद्धती आहे
5)आैषध
  #जवस 1 चमचा
  #तिळ 1चमचा
  #आवळा पावडर
  1चमचा   
#अश्वगंधा पावडर 1/2चमचा
# मेथी पावडर 1चमचारोज घ्या ☝
रोज उपाशी पोटी सकाळी �
आळीव 1 एक चमचा रात्री भिजत घाला सकाळी त्यात एक चमचा तुप एक 2 चमचे गुळ
2 चमचे तुप  इनायची
टाकुन खिर करून खा
वरील संपुर्ण उपचार पद्धतीमध्ये,रुग्णास सरासरीबरेच  दिवस उपचार  करावे लागेल,पोटातुन
औषधी साधारणतः २ ते ३ महिने घ्यावी लागतील.व्यक्ती,व्याधी व प्रकृती परत्वे उपचाराचा कालावधी बदलु शकतो.

योग्य आहार,योग्य व्यायाम व योग्य आैषधी उपचार 20 %
80% ,योग प्राणायाम व व्यायामाच्या
यांच्या सहाय्याने आपण100%
नक्कीच व्याधीमुक्त होवु शकतो
*#घरोघरी_आयुर्वेद*
*ताठ कणा हाच बाणा!!*
मानवी शरीरातील एक महत्वपूर्ण पण दुर्लक्षित अवयव म्हणजे पाठकणा होय. आपल्या संपूर्ण शरीराला तोलून धरणारा हा अवयव. मात्र त्याची कळत नकळत बरीच हेळसांड आपण करत असतो. वेडेवाकडे बसणे, बराच वेळ संगणकासमोर अवघडून बसणे, सतत पोटावर झोपणे, मऊ गाद्यांवर झोपणे, जमिनीवरील वस्तू उचलण्याकरता कंबरेतून वाकणे यांसारख्या कित्येक क्रियांद्वारे आपण मणक्याच्या दुखापतींना आमंत्रण देत असतो.
*मणक्यांची काळजी कशी घ्याल?*
- वेडेवाकडे बसणे निक्षून टाळावे. 'ताठ बस' हे शाळेपासून ऐकत आलेले आणि कधीही प्रत्यक्षात न उतरवलेले वाक्य आचरणात आणण्यास सुरुवात करावी.
- सतत संगणकासमोर बसून करायचे काम असल्यास; दर पाऊण ते एक तासाने ब्रेक घेऊन चक्क आळस दिल्याप्रमाणे आपले हात वरच्या दिशेने ताणून स्नायू मोकळे करावेत.
- मऊ मॅट्रेसचा त्याग करून कडक पण उबदार बिछान्यावर झोपणे सुरु करावे.
- खुर्चीत वगैरे बसताना आपली कंबर त्या खुर्ची वा सोफ्याच्या पाठीला टेकते आहे ना याकडे विशेष लक्ष द्यावे. नसल्यास पाठीमागे एखादी पातळ उशी घेऊन बसण्यास सुरुवात करावी.
- रोज तिळाचे तेल कोमट करून पाठीच्या कण्याला वरून खालच्या दिशेने लावावे आणि सुमारे दहा मिनिटांनी गरम पाण्याने अंघोळ करावी.
*मणक्याच्या दुखण्यावर इलाज:*
- सकाळच्या वेळी पाठीवर आडवे पडून आपले दोन्ही पाय सायकलिंग केल्याप्रमाणे हलवावेत. किंवा एक एक करून दोन्ही पायांनी हवेत सावकाश 0 हा आकडा रेखाटावा. असे केल्याने कंबरेचे स्नायू मोकळे होऊन मणक्यावरील त्यांचा ताण कमी होतो.
- आपल्या आयुर्वेदीय वैद्यांच्या सल्ल्याने बस्ति, कटीबस्ति, षष्टीशाली पिण्डस्वेद, तैलधारा या वा तत्सम अन्य क्रिया आणि पोटातून घेण्याची आयुर्वेदीय औषधे घेण्यास सुरुवात करावी.
- आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने आहारात डिंक, खजूर, उडीद, दूध, तूप यांचा समावेश करावा. तसेच आंबवलेले पदार्थ आणि एकंदरीतच वातूळ असलेले पदार्थ खाणे टाळावे.
- आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने या त्रासावर उपयुक्त योगासने नियमितपणे करण्यास सुरुवात करावी.
मणक्यांच्या त्रासांचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. पेनकिलर आणि व्हिटॅमिन डी च्या गोळ्या हा काही यावरील इलाज नव्हे हे वेळीच लक्षात घ्या. आपल्या मणक्यांची काळजी घ्या. आयुष्यभर ताठ पाठकण्याने जगा!!
====**===**=====***=====**=**=====
माणूस हा द्विपाद प्राणी आहे. दोन्ही पायावर चालण्यामुळे शरीराचे वजन दांडाला (मणका) तोलुन धरावे लागत असल्याने मणक्यांच्या दुखण्याचा त्रास उद्भवतो प्रत्येकाला कमी-अधिक प्रमाणात हा त्रास कधी ना कधी होतोच त्यात सध्या गावोगावचे खड्डेमय रस्ते याला बरेचसे कारणीभूत ठरताहेत. त्यामुळे कंबर, पाठ, मणक्याचे दुखणे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय ठरतो आहे.
आरोग्याविषयीची काळजी, ठराविक व्यायाम यासाठी कुणाला वेळच नाही. अस्थिरोगाविषयी पूर्ण विकसित ज्ञान मिळण्याची प्रक्रिया साधारणत: दुस-या महायुद्धानंतर विकसित झाली. तर, मणक्यावरील उपचारपद्धती त्याहीनंतर पूर्णत्वाने विकसित झालेल्या आहेत. त्यामुळे केवळ जनसामान्यांतच नव्हे तर काही वैद्यकीय व्यावसायिकांमध्येही योग्य त्या उपचारासंबंधी अनभिज्ञता आढळून येते. या विकारांनी त्रस्त असलेला रुग्ण योग्य मार्गदर्शनापासून वंचित राहातो. याचे मूळ कारण म्हणजे रूढ असलेल्या गैरसमजुती त्या म्हणजे पुढीलप्रमाणे आहेत :
1) स्पॉँडिलायसिस हा पूर्णत: कधीच ठिक होऊ शकत नाही
2) मणक्यावरील शस्त्रक्रियांमुळे अपंगत्व येऊ शकते
3) या शस्त्रक्रियांमुळे जड काम करता येत नाही. आदी
टाळता येण्याजोगी कंबरेची दुखणी कोणती : -
चुकीच्या बसण्याच्या किंवा झोपण्याच्या पद्धतीने होणारा हा त्रास पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. उदा. सर्वात बसण्याची आरामदायी पद्धत कोणती तर उत्तर असे आहे की, लेझी बॉइज पोझ म्हणजेच एकदम कुबड काढून व एकदम ताठ बसणेही चूक, तर कार्यालयीन काम करताना साध्या लाकडाच्या खुर्चीवर एक साधारण उशी ठेवून पाय व कंबर आक्रसून न ठेवता मोकळी ठेवावी.  
झोपावे कसे  : पूर्ण सरळ वा पालथे झोपण्यापेक्षा छोटी उशी घेऊन, गुडघे थोडे दुमडून एका कडेवर निजणे हे मणक्यांसाठी सर्वात आरामदायी आहे. तसेच लाकडाच्या किंवा लोखंडाच्या कडक पलंगावर कापसाची गादी टाकून झोपावे. मात्र, निवार(खाट, बाज) असलेल्या पलंगावर नाही. जमिनीवर गादी टाकून झोपावे. आपल्या वाहनाची सीट तिरपी तर नाही याचीही खात्री करा. त्याचप्रमाणे वाहनाची नियमित तपासणी (शॉकअ‍ॅब्झॉर्बर ठिक आहेत ना) केल्यानेही कंबरेचा हा अनावश्यक त्रास टाळता येतो.
डिस्क प्रोलॅप्स किंवा स्लीप डिस्क म्हणजे काय :
आपल्या शरीरात 33 मणके असतात. त्या मणक्यांना जोडणारी गादी म्हणजे डिस्क म्हणजेच कुर्चा. या कुर्चेवर सर्व साधारणपणे माणूस उभा असतो, कुर्चेवर वजन 30 पाउंड प्रतिचौरस इंच असेअसते तर ते प्रेशर 120 पौेड प्रतिचौरस इंचाला असेल तर, माणूस समोर वाकताना ते वाढते. अर्थात समोर वाकल्यावर चौपट प्रेशर कुर्चेवर येते. या वजनाखाली ही डिस्क किं वा गादी फाटते व मागे सरकते व मज्जासंस्थेवर दाब देते. यामुळे कंबरेचा त्रास उद्भवू शकतो, मज्जारज्जू दबतो व भयंकर वेदना होतात प्रथम कंबरेत उसण भरली असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
गुडघेदुखी : कोणताही आजार होण्याआधी शरीर आपणाला काहीतरी लक्षण सांगत असते गुडघेदुखी एकदम सुरू होत नाही ती गंभीर होण्याआधी कुरबुरीचे काही संकेत मिळत असतात त्याला जाणून घेऊन त्याला योग्य तो प्रतिसाद द्यायला हवा. गुडघेदुखी चालू झाल्यावर ती अंगावर न काढता घरगुती उपाय न करता डॉक्टराकडे जावे.
वृद्धापकाळ व ठिसूळ हाडे : वृद्धापकाळात अपघात होणं म्हणजे शाप आहे. अधिक खबरदारी घेणे हा त्यावर उ:शाप आहे. या वयात मधुमेह, अस्थिरोग वगैरे आजार असल्यास शरीराची हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते. याशिवाय असणा-या आजारावरील औषधी घेत असल्याने त्याचा परिणामही हाडे कमजोर बनण्यात होतो. कॉर्टिझोन या औषधाचा परिणाम हाडांचे ठिसुळपणावर जास्त होतो. त्यामुळे हाडे मोडतातही.
हाडे ठिसूळ होण्याची इतरही कारणे आहेत : -
1) इस्ट्रोजन हार्मोन कमी प्रमाणांत उपलब्ध होणे 2) शारिरिक अशक्तता, कमजोरपणा 3) शारीरिक हालचाली कमी झाल्यास 4) कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे वगैरे 5)हाडातील पेशींची वाढ ही हळूहळू मंदावत जाते. जुन्या अस्थिपेशी बाजूच्या हाडाच्या वाढीच्या बदल्यात नष्ट पावतात व परत नव्या पेशी तयार होत नाहीत त्यामुळे हाडे विघटन पावू लागतात. हाडात चरबी साठते, ठिसूळ हाडे दाब पडल्याने खचतात त्यामुळे साध्या धक्क्यानेही पाठीच्या मणक्यातही मोडतोड होऊ शकते.

   निवडक लेख  

मणक्यांचे आजार- उपचारपद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाय
डॉ. मनीष सबनीस (मेंदू व मणक्यांचे तज्ज्ञ), शब्दांकन- संपदा सोवनी
‘स्लिप डिस्क’ अर्थात मणक्यांची चकती घसरण्याच्या आजाराचे निदान झाले की त्यावर कोणते उपचार करावेत याबाबत रुग्णांच्या मनात शंका असतात. आता शस्त्रक्रियाच करावी लागेल का, ट्रॅकशन लावून काही उपयोग होईल का असे अनेक प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरेही ‘ओपीडी टू ओपीडी’ बदलतात. काही रुग्णांना व्यायामाचा सल्ला दिला जातो. काही रुग्णांना ‘ताबडतोब शस्त्रक्रिया केली नाही तर चालता येणार नाही’ अशी भीतीही घातली जाते!
ज्याला नस दाबली जाऊन मणक्याची चकती घसरण्याचा आजार झाला आहे त्याचे दुखणे प्रचंड असते. अशा रुग्णाला जर पाठ दुखण्याव्यतिरिक्त पायांत बधिरपणा जाणवत नसेल, किंवा पायांतील ताकदही कमी झालेली नसेल तर त्याने कमीत- कमी दहा दिवस शब्दश: ‘बेड रेस्ट’ घ्यायला हवी. ऑफिसला सुट्टी घेऊन घरी खाटेवर टीव्ही बघत बसणे म्हणजे बेड रेस्ट नव्हे. दिवसभर शिस्तीत विश्रांती घेऊन रात्री बसून एखादी मालिका बघू, असेही चालणार नाही! घसरलेल्या चकतीवर शरीराचे वजन पडल्यास चकतीच्या आजूबाजूला असणारे पाणी चकतीच्या फाटलेल्या आवरणातून बाहेर पडू लागते. असे होऊ नये म्हणून विश्रांतीचा उपयोग होतो. सतत काम करण्याची सवय असणाऱ्या माणसासाठी दहा दिवस झोपून राहणे अवघड आहे. पण जे रुग्ण नेट लावून ही विश्रांती घेतात त्यांना दुखण्यात लक्षणीय फरक पडलेला दिसतो.
शंभरपैकी साठ रुग्णांना केवळ दहा दिवसांच्या बेड रेस्टने निम्म्याहून अधिक आराम पडतो. असे बरे वाटू लागले की या रुग्णांना पुढे करावयाचे व्यायाम सांगितले जातात. हे व्यायाम सातत्याने आणि योग्य पद्धतीने केले असता सरासरी तीन महिन्यांत चकती घसरण्याचा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणजेच साठ टक्के रुग्णांना ऑपरेशनचा ‘अ’ देखील पाहावा लागत नाही!  दुखणे कमी करण्यासाठीच्या गोळ्या घ्याव्यात की न घ्याव्यात, हादेखील रुग्णांचा नेहमीचा प्रश्न असतो. मात्र सुरूवातीच्या बेड रेस्टच्या काळात या गोळ्या घ्याव्या लागतात. दुखणे कमी करण्याची आणि सूज कमी करण्याची औषधे वेगळी असतात हे लक्षात घ्यायला हवे. उदा. काँबिफ्लॅम हे सूज कमी करण्याचे औषध आहे. चकती घसरण्याच्या आजारात सूज या घटकाचा फारसा समावेश नसतो. त्यामुळे सूज कमी करणारी औषधे या विशिष्ट आजारात उपयोगी पडत नाहीत. ही औषधे किडनीकडून शरीराबाहेर टाकली जातात. त्यांच्या दीर्घकालीन वापराने किडनीवर काही विपरित परिणाम होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे दुखण्यावर डॉक्टरांकडून ‘अ‍ॅनाल्जेसिक’ प्रकारची औषधे सुचविली जातात. ही औषधे साधारणपणे दहा- पंधरा दिवस घ्यावी लागतात. त्यानंतरही रुग्णाला दुखणे कमी करण्यासाठी औषधांची गरज भासत असेल तर त्याचा चकती घसरण्याचा आजार बेड रेस्टमुळे बरा होणाऱ्यातला नाही हे समजावे. पण म्हणून लगेच पुढचे पाऊल शस्त्रक्रियाच असेल असे नाही! गैरसमजामुळे आणि शस्त्रक्रियेच्या भीतीने असे रुग्ण आजार अंगावर काढत राहतात. चालढकलीमुळे प्रत्यक्षात आजार वाढत जाऊन पायात बधिरपणा येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. हळू- हळू पायांतील ताकदही कमी होऊ शकते. मग मात्र नाईलाजाने रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी तयार व्हावे लागते. या परिस्थितीत शस्त्रक्रिया जरी केली तरी रुग्णाच्या पायांतील आधीच खूप कमी झालेली ताकद शस्त्रक्रियेमुळे पूर्णपणे भरून येईलच याची ग्वाही देता येत नाही. ज्यांना औषधे आणि विश्रांतीने बरे वाटते त्यांच्यासाठी वेगवेगळे व्यायाम आहेत. मात्र या रुग्णांना व्यायाम नियमितपणे करावेच लागता. ‘दोन महिने व्यायाम करून बरे वाटते आहे, आता व्यायाम थांबवू’, असे म्हणून चालणार नाही. व्यायामातील अनियमितपणामुळे चकतीचा आजार पुन्हा उद्भवू शकतो. मणक्यांचे आजार म्हणजे पाठीचे व्यायाम असा सगळ्यांचा समज असतो. पण फक्त पाठीचेच स्नायू बळकट करून (पॅरास्पाईनल स्ट्रेंथनिंग) पुरत नाही. मणक्यांसाठीचे व्यायाम करताना पोटाला विसरून कसे चालेल! त्यामुळे पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठीचे ‘अबडॉमिनल स्ट्रेंथनिंग’ व्यायाम आणि पोटाच्या आत मणक्याला चिकटून असणाऱ्या स्नायूंसाठीचे ‘कोअर स्टॅबिलिटी’ व्यायामही रुग्णांना सांगितले जातात. वेगवेगळ्या गटातील स्नायूंना एकाच वेळी व्यायाम मिळाला तरच आजाराला दीर्घकालीन आराम पडू शकतो.
‘व्यायाम केल्याने आमचे दुखणे वाढते’ अशी तक्रार अनेक रुग्ण करतात. व्यायाम केल्यावर दुखणे वाढण्याचे दोन अर्थ होऊ शकतात. एकतर रुग्ण चुकीच्या पद्धतीने व्यायाम करत असेल किंवा सांगितलेले व्यायाम रुग्णाला मानवणारे नसतील. अशा वेळी वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यायामांत बदल सुचविले जातात.
====**===**=====**=====**==**
मणक्यांचे काही आजार : स्पाँडिलायटिस
   मानदुखी
मानदुखीचा आजार भारतात खूप आढळतो. मानदुखी ही मुख्यत: मानेतील मणक्यांचा आजार आहे. मणके झिजून त्यातली कूर्चा-गादी दबणे, बारीक अस्थि-गुठळया तयार होणे, यामुळे आतील चेतारज्जू आणि बाहेर पडणा-या नसांना घर्षण व इजा होणे या सर्वांचा मिळून हा आजार होतो.
कारणे
मणक्यांची झीज होणे हा यातला मुख्य दोष आहे. मणक्यांची झीज जेवढी जास्त, तेवढी लक्षणे जास्त होतात. भारतात यासाठी काही विशेष कारणे आढळतात.
डोक्यावर सतत भार वाहणारे गट - हमाल, माथाडी कामगार, रस्त्यावर खडी-दगड वाहणारे मजूर, वर्षानुवर्षे डोक्यावर पाण्याचे हंडे वाहणा-या स्त्रियांना हा आजार लवकर गाठतो.
शिवाय वयोमानाप्रमाणे मणक्यांची झीज होतच असते.
लक्षणे
-  मानदुखी, मान जड होणे, मानेत कळा येणे, कवटीच्या तळाशी मानेत दुखणे.
-  पाठीच्या फ-यांमध्ये दुखणे (कण्याच्या दोन्ही बाजूला फ-याच्या पातळीत दुखणे)
-  खांद्याच्या भागात दुखणे.
-  डोकेदुखी - मागे सुरु होऊन डोक्याच्या वर पसरते.
-  चेतातंतूंवर दबाव आल्याने पुढील लक्षणे दिसतात: पाठीचा चौकोन, खांदा, दंडाचा पुढील भाग, मनगटाचा भाग, अंगठा, इ. ठिकाणी वेदना जाणवते. हे सर्व भाग मानेच्या मणक्यातून निघणा-या चेतातंतूंशी संबंधित आहेत. या भागातले स्नायू पुढे दुबळे होत जातात. चेतातंतू हाडांच्या-गुठळयांनी दाबले-रगडले जाणे हे त्याचे कारण आहे. काही जणांना मान पुढे वाकवल्यावर विजेचा झटका हातापर्यंत चमकतो.
-  याच भागात मुंग्या येतात. टोचल्याप्रमाणे संवेदना होतात.
-  कूर्चा चेतारज्जूवर दाबल्यामुळे विशिष्ट लक्षणे दिसतात. हाता-पायात दुबळेपणा जाणवतो, शक्ती कमी होते. लघवी, गुदद्वाराचे नियंत्रण कमी होते. अर्थातच हा आजार आता जास्त झालेला असतो.
-  मणक्याजवळच्या रक्तवाहिनीवर दाब आल्याने काही लक्षणे दिसतात. यात मुख्यत: चक्कर (मेंदूकडे रक्त कमी पडल्याने) हे लक्षण असते. चक्कर तात्पुरती किंवा सतत येते. चक्कर येण्याचे आणखी एक कारण म्हणजे मानेभोवतीच्या स्नायू व पडद्यांचा सतत ताण हे असते.
रोगनिदान
वरील लक्षणांवरून रोगाची शंका घेणे शक्य आहे. पुढील निदान व सल्ल्यासाठी डॉक्टरकडे पाठवावे. मानेचा क्ष किरण फोटो काढून आजाराचे प्रमाण निश्चित करता येते. आवश्यक वाटल्यास जास्त तपासण्या कराव्या लागतील. (उदा. सीटी स्कॅन किंवा एम.आर.आय. फोटो)
उपचार
सौम्य किंवा मध्यम आजार असल्यास साध्या उपायांनी याची लक्षणे कमी होतात. (पण मूळ आजार बरा होत नाही) यासाठी
-  मानेखाली कमी रुंदीची मऊ उशी घ्यावी. यामुळे मान नेहमीपेक्षा उलटबाजूला वाकून तिला विश्रांती मिळते.
-  पुढे वाकण्याचे, मान खाली करण्याचे प्रसंग टाळावेत. काम करताना मान ताठ किंवा मागे वाकलेली चांगली. यासाठी टेबलावर काम करताना उतरती फळी वापरावी. (पूर्वीचे दिवाणजींचे मेज चांगले)
-  मानेला हलका शेक, मसाज यांचा चांगला उपयोग होतो.
-  मानेचे व्यायाम करून स्नायू बळकट करणे आणि स्नायूबंध/पट्टे ढिले करण्याने वेदना कमी होत जाते.
-  वेदनेसाठी तात्पुरत्या वेदनाशामक गोळया घ्याव्यात.
-  प्रवासात मानेचा पट्टा वापरावा. यामुळे मानेला व मणक्यांना धक्के बसत नाहीत.
-  शरीरात 'गंजरोधक' पदार्थ (ऍंटी-ऑक्सिडंट) वाढण्यासाठी चांगला ताजा आहार घ्यावा. प्राणायाम करावा.
-  तीव्र आजार असल्यास (स्नायू दुबळे होणे, खूप वेदना, शॉक प्रमाणे चमकणे, लघवी-गुदद्वारावरचे नियंत्रण कमी होणे) यासाठी शस्त्रक्रिया लागू शकेल. या शस्त्रक्रियेच्या तंत्रात आता खूपच प्रगती झाली आहे. सूक्ष्म शस्त्रक्रियातंत्राने  'दुरुस्त्या' करण्यामुळे मोठी शस्त्रक्रिया टळते. याबद्दल अर्थातच तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
धन्यवाद!!

3 comments:

  1. Aaplyala mumbai madhye kuthe karata yeil he sangu shakal ka aslyas kalvave 9892075388 milind palande

    ReplyDelete
  2. Mala khup trasa hot ahe cervical spine cha mala asa vathya ki he kaymcha bara hot nahi plz help me

    ReplyDelete
  3. Hi mi ratnagirila asato mala geli 3 varshe kambardukhi ani mandukhi cha tras ahe. Jast vel basavlyavarch, ubhe rahila variety, pudhe vakun kam kelyavar kambardukhi hote. varnvar man avaghadate
    Pl.help mi

    ReplyDelete