सुस्वागतम...माझ्या या शैक्षणिक ब्लॉगवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे......... WEL-COME ON MY BLOG .......

Saturday 18 July 2020

काही तरी प्रेरणादायी

1*छोट्याश्या शाळेच्या परिवर्तनशील प्रयत्नाला लाभली परदेशातूनही मदत...!*

*'दुबई' येथे वास्तव्यास असलेल्या कासम शेख यांनी विद्या मंदिर बशाचामोळा शाळेस दिली आर्थिक स्वरुपात शुभेच्छा भेट !*

          शाळा व ग्रामस्थ यांच्या संयुक्त योगदानातून आम्ही परिवर्तनाची एक नवी दिशा निर्माण केली. एका छोट्या खेड्यातील ही शैक्षणिक जागृती पाहून कोणतीही मागणी न करता महाराष्ट्रातील अनेक शिक्षकमित्रांनी हजारो रुपयांची मदत ऑनलाइन स्वरुपात पाठवली. सदरची संघर्षमय व प्रेरणादायी वाटचाल पाहून सामाजिकभान अन संवेदनशील मन असणाऱ्या श्री. संपत देसाई (सोनाळी) यांनी आपला वाढदिवस दोन दिवसापूर्वीच या शाळेत साजरा करुन आर्थिक स्वरुपात मदत केली होती.
     सोशल मीडियामुळे सदरची बातमी संपत देसाई यांचेच मित्र  सध्या दुबईत असणारे कासम शेख यांनी समजली. शेख तसे मूळचे अनफ खुर्द गावचे पण कामामुळे ते सध्या दुबई येथे वास्तवास असतात. आपल्या गावाशेजारी चाललेल्या या शैक्षणिक प्रगतीचा त्यांना अभिमान व आनंद वाटला लागलीच त्यांनी आम्हा शिक्षकांचा संपर्क क्र. घेवून अभिनंदन केले शिवाय चार हजार रुपयांची आर्थिक मदत पाठवाली व पुढील कामास शुभेच्छा दिल्या.
         संपत देसाई असोत ! की कासम शेख ! या पूर्वी या लोकांची आम्हास ओळखही नव्हती तरीही दुसऱ्या गावातील मुलांच्या शिक्षणासाठी... एका चांगल्या प्रयत्नासाठी या मान्यवरांनी कोणतीही मागणी न करता स्वच्छेने योगदान दिले!
      *आज आपल्या महाराष्ट्रात महात्मा फुले, क्रांतिज्योति सावित्री..शाहू महाराज निर्माण व्हावेत अशी स्थिती...अशी गरज नक्कीच नाही. मात्र आधुनिक काळात शिक्षणाला... विद्यार्थ्यांच्या उज्वल  भविष्यासाठी संपत देसाई, कासम शेख आपणासरखे विशाल हृदयी अन संवेनशील मनाची माणसे समाजात पदोपदी निर्माण व्हावीत ! ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाचे एक नवे पर्व उद्यास यावे ! हीच एक शिक्षणाचा वारकरी म्हणून ईश्वरचरणी प्रार्थना !*
🙏🙏💐💐

   _आपल्या दातृत्ववृत्तीस आणि संवेदनशील भावनेस सलाम ! आणि खुप खुप आभार  !_


✍  Sachin Desai
        
(V.M.BASHACHAMOLA TAL: BHUDATGAD)