सुस्वागतम...माझ्या या शैक्षणिक ब्लॉगवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे......... WEL-COME ON MY BLOG .......

Friday 2 December 2016

आपला आरोग्यमित्र ;भाग ३ आजचा विषय : ' पालेभाज्या ' ....निरोगी आयुष्याची खरी संजीवनी


हिरव्या पाले भाज्यांमधे सर्व महत्वाचे पोषक घटक असल्यानं शरिराची वाढ तसेच चांगल्या आरोग्यासाठी त्या महत्वाच्या असतात.
भारतामध्ये विविध प्रकारच्या हिरव्या भाज्या खाल्ल्या जातात, त्यामध्ये सर्वात लोकप्रिय आहेत पालक, माठ, गोगू, मेथी, शेवग्याची पाने, पुदिना इत्यादी.
रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या समाविष्ठ करण्यामूळे अशक्तपणा टाळता येऊ शकतो आणि उत्तम आरोग्याला चालना मिळते.
हिरव्या पालेभाज्या कॅल्शिअम, बीट कॅरोटीन आणि क जीवनसत्वाचा समृध्द स्रोतदेखील आहेत.
भारतामध्ये पाच वर्षाखालील अंदाजे 30,000 बालकं अ जीवनसत्वाच्या अभावामूळे अंध बनतात.  हिरव्या भाज्यांमधील कॅरोटीन शरीरात परिवर्तित होऊन अ जीवनसत्व बनते जे अंधत्व टाळते.
हिरव्या भाज्यांमधील क जीवनसत्व टिकवून ठेवण्यासाठी, त्या अधिक काळपर्यंत शिजवू नयेत, कारण हे पोषक तत्व जे हिरड्यांना चांगल्या स्थितीत ठेवते, भाज्या अधिक काळ शिजवल्यास ते नष्ट होते.
हिरव्या भाज्यांमध्ये काही बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्वं देखील असतात.
हिरव्या पालेभाज्यांचे शिफारसकृत आहारातील प्रमाण एका प्रौढ महिलेसाठी ग्रॅम / प्रति दिन, पुरुषासाठी ४० ग्रॅम / प्रति दिन, शालेयपूर्व मुले (४-६ वर्षे) ५० ग्रॅम / प्रति दिन असले पाहिजे. १० वर्षे वयाच्या वरील मुले आणि मुलींसाठी हे प्रमाण ५० ग्रॅम प्रति दिन असावे.
सामान्यतः असं मानलं जातं की हिरव्या भाज्यांमुळं लहान मुलांना हगवण होते.  त्यामुळं अनेक आया आपल्या मुलांना या पोषक अन्नापासून दूर ठेवतात. अनेक प्रकारचे जिवाणू / जंतू / किडे आणि इतर विचित्र पदार्थ हिरव्या भाज्यांना पाणी आणि मातीतून दूषित करतात.  आणि त्या जर नीट धूऊन घेतल्या नाहीत तर खाल्ल्यानंतर हगवण लागू शकते.  अशा प्रकारचे प्रदूषक काढून टाकण्यासाठी सर्व पालेभाज्या वाहत्या पाण्यात चांगल्या धुऊन घ्याव्यात आणि हगवण होणे टाळावे.
लहान बाळांना भाज्या ह्या शिजवून, कुस्करुन आणि गाळून घेऊन, जेणेकरुन त्यातला तंतूमय भाग निघून जाईल, मगच खायला द्याव्यात.  हिरव्या भाज्यांचे पोषण मूल्य टिकवून ठेवण्यासाठी, जादा किंवा अति प्रमाणात शिजवणे टाळावे, तसेच शिजवल्यानंतर या भाज्यांपासून मिळणारे पाणी फेकून देऊ नये.  हिरव्या भाज्या ज्या भांड्यात शिजवल्या जातील त्यावर झाकण असेल याची काळजी घ्या.  भाज्यांची पाने उन्हात सुकवू नका अन्यथा त्यातील कॅरोटीन नष्ट होईल.  हिरव्या भाज्या तेलावर परतू नका.
हिरव्या भाज्यांचे पोषण मूल्य हे त्यांच्या किंमतीवर ठरवू नका.  बहुतेक लोक तसं करतात आणि त्या दुय्यम महत्वाच्या असल्याचं समजून त्यांना टाळतात. हिरव्या भाज्या स्वस्त असल्या तरी, त्या अत्यंत पोषक असतात आणि सर्वांनाच आवश्यक असतात.
हिरव्या पालेभाज्यांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात यावे जेणेकरुन त्या वर्षभर उपलब्ध होतील.  परसबाग, छतावरील बाग, शाळेतील बाग इत्यादी ठिकाणं ही हिरव्या पालेभाज्या उगवण्यासाठी आदर्श आहेत.  शेवगा, अगाथी इत्यादी झाडांच्या हिरव्या पानांचा उपयोग हा ते झाड परसात लावलेले असेल तर फारसा प्रयत्न न करता नियमितपणे उपलब्ध होऊ शकतो.
मेथीच्या बियांचा वापर रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी होतो.
रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर
मधुमेह आणि हृदयरोग हे आपल्या लोकांमध्ये आढळून येणारे काही सामान्य रोग आहेत.  रक्तातील साखरेची किंवा कोलेस्टेरॉलची उच्च पातळी यांच्यामूळे आरोग्याची इतरही गुंतागुंत होते.  हैदराबादच्या राष्ट्रीय पोषाहार संस्थेनं आपल्या संशोधनांमधून निष्कर्ष काढला आहे की मेथीचे दाणे या दोन्ही समस्यांवर उपयुक्त आहेत.  अशा रुग्णांनी मेथीचे दाणे सेवन केल्यास नेहमीच्या नेमून दिलेल्या औषधांच्या उपचाराला जोड मिळते.  मेथीचे दाणे किती प्रमाणात खावेत, ते खाण्याची पध्दत आणि इतर खबरदारी याची माहिती खाली दिलेली आहे.
भारतीय स्वयंपाकामधे एक मसाला म्हणून वापरले जाणारे मेथीचे दाणे किराणा दुकानात मिळतात.
या दाण्यांमध्ये चोथ्याचं प्रमाण अधिक असल्यानं (५0 टक्के), ते मधुमेहावरील उपचारात, रक्त आणि लघवीतील साखर आणि उच्च सीरम कोलेस्टेरॉल असणा-या रुग्णांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात उपयुक्त ठरतात. मेथीचे कच्चे तसेच शिजवलेल्या दाण्यांमधे हे गुणधर्म असतात.
मेथीची पानं (मेथी साग, एक हिरवी पालेभाजी म्हणून सामान्यपणे वापरली जाते) असा कोणताही प्रभाव दाखवू शकत नाहीत.
मेथीचे दाणे खाण्याचं प्रमाण हे मधुमेहाची तीव्रता आणि सीरम कोलेस्टेरॉलची पातळी यांच्यावर अवलंबून असतं. त्याचा डोस २५ ग्रॅम ते ५० ग्रॅम इतका असू शकतो.
सुरुवातीला २५ ग्रॅम मेथीचे दाणे प्रत्येकी १२.५ ग्रॅमच्या दोन समान डोसमधे (अंदाजे दोन चहाचे चमचे) दोन मुख्य जेवणं – दुपारचं आणि रात्रीचं, यांच्यासोबत घ्यावेत.
हे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर तसेच खावेत किंवा ते कुटून पाण्यात किंवा ताकात मिसळून, जेवणापूर्वी १५ मिनिटे खावेत.
या दाण्यांची कडू चव कमी करण्यासाठी ठराविक प्रक्रिया करावी लागते.  सध्या, कडवटपणा काढलेले मेथीचे दाणे बाजारात उपलब्ध नाहीत.
दाण्यांचा लगदा (रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर) किंवा भुकटी ही पोळ्या, दही, डोसा, इडली, पोंगल, उपमा, दलिया, ढोकळा, डाळ आणि भाज्यांची आमटी यात वापरता येते.
रक्तातील आणि लघवीतील साखरेची उच्च पातळी आहे तोवर मेथीचे दाणे घ्यावेत.
मेथीच्या दाण्यांच्या उपचारासोबतच चालणे यासारखा व्यायाम नियमित करण्यानं देखील फायदा होतो. शरीराचं वजन कमी करण्यानं देखील इन्शुलीनचं कार्य सुधारतं. त्यामूळे, संपृक्त चरबी आणि साधी साखर यांच्यापासून मिळणारे आहारातील उष्मांक कमी होतात.
काही रुग्णांना मेथीचे दाणे सेवन केल्यानंतर सुरुवातीला अतिसार किंवा अति प्रमाणात वायू सरण्याचा त्रास होऊ शकतो.
मेथीचे दाणे हे केवळ आहाराला पूरक असा उपचार आहे आणि नेहमीचे मधुमेह-विरोधी उपचार चालूच ठेवायचे आहेत.  तथापि, मेथीदाण्यांचा वापर करण्यानं मधुमेह-विरोधी औषधांचा वापर कमी करता येतो.  मधुमेह-विरोधी औषधांची वेयक्तिक कमाल मात्रा यासंबंधी सल्ला देता येणार नाही.  आपल्या स्थितीच्या अनुसार केवळ आपले डॉक्टरच योग्य ते औषध आणि त्याचा डोस ठरवू शकतात. 
===============
भाज्यामुळे व इतर अन्नपदार्थातून  मिळणारी जीवनसत्वे (व्हिटामीन्स) आणि खनिज पदार्थ(मिनरल्स)
अ(A)
प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी–यातून मिळते
ब १ (B 1)
पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननस–यातून मिळते
ब २ (B 2)
मनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, पेशींना प्राणवायू पुरवते यीस्ट, अंड्यातील पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, दूध–यातून मिळते
ब ३ (B 3) कोलेस्टरॉल कमी करते, रक्ताभिसरणातील दोष दूर करते, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते हिरव्या पालेभाज्या, दाणे, यीस्ट–यातून मिळते
ब ५ (B 5)
शरीरातील शक्ती वाढवते धान्ये, सोयाबीन, अंड्यातील पिवळा बलक–यातून मिळते
ब६ (B 6)
प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त, मनावरील ताण कमी करते, हार्मोन्स तयार करते सोयबीन, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बीया–यातून मिळते
ब१२ (B 12)
पेशी निर्मिती साठी आवश्यक, लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्वाचा सहभाग यीस्ट, दुग्धजन्य पदार्थ–यातून मिळते
फॉलिक ऍसिड
लोह पचण्यास मदत करते, शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते (गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते) गडद हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, कंदभाज्या, दूध, खजूर, संत्र्याचा रस–यातून मिळते
क (C)
प्रतिकारशक्ती वाढवते, अल्सर निर्मितीस विरोध करते, दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते, लोह पचविण्यास मदत करते लिंबूवर्गातील फळे (संत्रे, मोसंबी...) कांदा, लसुण, मिरची, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षे–यातून मिळते
ड (D)
कॅल्शियम पचविण्यास मदत करते, हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक) सुर्यप्रकाश, लोणी, दूध, अंड्यातील पिवळा बलक–यातून मिळते
इ (E)
रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते, रक्तप्रवाह सुरळीत ठेवते, पेशींना प्राणवायू पुरविण्यात मदत करते लोणी, अंडी, लेट्युस, पुर्ण धान्ये, दूध, पालक, सोयबीन, सुर्यफूल, भोपळा–यातून मिळते
फ (F)
कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयरोगांचा प्रतिकार करते दाणे, काजू–यातून मिळते
के (K)
रक्ताभिसरणासाठी उपयुक्त. (गर्भवतीला शेवटच्या महिन्यात अतिशय उपयुक्त) यीस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सुर्यफूलाचे तेल, अंड्यातील पिवळा बलक–यातून मिळते
खनिजे
लोह
सर्व शरीराला प्राणवायूचा पुरवठा करते, पेशींमधील महत्वाच्या कार्यांना चालना देते (गर्भवतीस अतिशय आवश्यक) चेरीचा रस, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, पुर्ण धान्य, सुकामेवा, कलिंगड, अंड्यातील पिवळा बलक, बीट
कॅल्शियम
हाडांच्या व दातांच्या जडणघडणीसाठी आवश्यक, मज्जातंतू तसेच स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवते दूध, गडद हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, संत्री, पपई, कलिंगड, गाजर–यातून मिळते
फॉस्फरस
कॅल्शियम, तसेच ड जीवनसत्वाच्या कार्यात मदत करते, उत्तम हाडांसाठी आवश्यक, शरीरातील ग्रंथींच्या कार्यासाठी आवश्यक दुग्धजन्य पदार्थ, पूर्णं धांन्ये, धान्याचे मोड, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, काजू, बदाम–यातून मिळते
पोटॅशियम
स्नायुंचे आकुंचन होण्यासाठी आवश्यक, शरिरात सोडीयम ची आवश्यक पातळी कायम ठेवते केळी, खजूर, पपई, धान्याचे मोड, पालेभाज्या–यातून मिळते
मॅग्नेशियम
प्रथिनांच्या पचनास, तसेच चरबीच्या वापरात मदत करते, कॅल्शियमची आवश्यक पातळी कायम ठेवते, तणावापासून मुक्ती देते हिरव्या पालेभाज्या, काजू, बदाम, दुग्धजन्य पदार्थ–यातून मिळते
झिंक
उत्तम वाढीसाठी, मेंदू आणि चेतासंस्था निर्मितीस सहाय्यक, आजार लवकर बरे करते. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक) केळी, पुर्ण धान्ये, काजू, बदाम, धान्याचे मोड, दुग्धजन्य पदार्थ–यातून मिळते
==========================
रसोपचार एक प्रभावी इलाज 

व्याधीजर्जर लोकांना व्याधीतून मुक्‍त करण्यासाठी औषधे व इंजेक्शन्सनी जे साधले जात नाही ते योग्य व समतोल आहार, तसेच पालेभाज्या व फळांचा रस यांनी साधले जाते. अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी, शरीराच्या नवनिर्मितीसाठी आणि कायाकल्प करण्यासाठी पालेभाज्या, फळांचा रस आणि न शिजवलेला आहार अत्यंत उपयुक्‍त आहे, हे प्रयोगांनी सिद्ध झाले आहे. रक्‍तातील रक्‍तकण आणि पेशी बदलण्याचे कार्य त्वरेने करावयाचे असेल, तर रसोपचाराला दुसरा पर्याय नाही. पालेभाज्या व फळांच्या रसाद्वारे केलेला उपचार हा निर्दोष, सुरक्षित व दुष्परिणामविरहित असतो. पालेभाज्या व फळांच्या रसातून मिळणार्‍या पोषक तत्त्वांची अतिशय जरुरी आहे. कारण, त्यात असणार्‍या शर्करेत व इतर घटकांत खूपच पाचकशक्‍ती असल्याने ते सहजतेने रक्‍तात मिसळून नवनिर्मितीची क्रिया सुरू करतात. पालेभाज्या व फळांचे काही रस अतिशय सस्वादहीन असतात, अशी अनेकांची तक्रार असते. त्यासाठी रसांचे योग्य मिश्रण करून रस स्वादिष्ट बनवता येतात. मात्र, फळे व पालेभाज्या यांचा रस एकाच वेळी घेऊ नये. सकाळी फळांच्या रसाचे सेवन करावे व दुपारी किंवा संध्याकाळी पालेभाज्यांचा रस घ्यावा. शरीरातील रक्‍तकण आणि पेशींच्या नवनिर्मितीसाठी जीवनसत्त्वे, क्षार व एन्झाईम्सची आवश्यकता असते. ही तत्त्वे कच्च्या पालेभाज्या, फळे आणि त्यांचे रस यामधून तर मिळतातच; पण काही प्रमाणात ही तत्त्वे आपल्या शरीरातही निर्माण होतात; पण जसजसे तारुण्य ओसरत जाते, तसतशी शरीराची ही नवनिर्मितीची क्षमता कमी कमी होत जाते. तेव्हा तारुण्य ओसरू लागल्यावर पचनास हलक्या आहाराची आवश्यकता असते. अशा पोषक आहारामुळे शरीराची नवनिर्मितीची शक्‍ती कार्यक्षम राहते. फळे व पालेभाज्यांचे रस वृद्धापकाळातील ही गरज पूर्ण करण्याचे महत्त्वाचे काम करतात.
रसाहारामध्ये फळांचा रस अधिक पौष्टिक की, पालेभाज्यांचा रस अधिक पौष्टिक हा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. या प्रश्‍नाच्या उत्तरात आहारशास्त्रज्ञांमध्येच मतभिन्‍नता आहे. काहींचे मत आहे की, मानवजातीला फळांचा रस अधिक पोषणयुक्‍त आहार आहे. तर आजपर्यंत झालेल्या काही प्रयोगांवरून पोषकतेच्या द‍ृष्टीने पालेभाज्यांचा रस फळांच्या रसापेक्षा अधिक हितकर आहे, असे सिद्ध होते. शरीरस्वास्थ्यासाठी व रोगनिवारणासाठी फळांच्या व पालेभाज्यांच्या रसांचा आपण संतुलित उपयोग केला पाहिजे. फळांचा रस रक्‍तशुद्धीचे काम करतो. शरीराच्या कोषांमध्ये साठवलेली विषारी द्रव्ये तो शरीराबाहेर टाकतो. फळे किंवा फळांच्या रसाच्या सेवनाने लघवी जास्त होते. त्यामुळे मूत्रद्वारा शरीरात साठलेल्या विषारी द्रव्यांचा निचरा होतो, तर कच्च्या पालेभाज्या व त्यांचा रस शरीरात नवनिर्मितीचे काम करतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे नष्ट झालेल्या शरीरातील पेशींच्या जागी पालेभाज्यांचे रस नवीन पेशी निर्माण करतात. काहींमध्ये एखादा घटक विपुल प्रमाणात असतो, तर काहींमध्ये दुसरा घटक अधिक असतो. फळे वा पालेभाज्यांचे रस परस्परांना पूरक आहेत.
रस ताजा हवा
रसांतील सर्व पौष्टिक तत्त्वे प्राप्‍त करण्यासाठी फळे, पालेभाज्या, तसेच त्यांचा रस ताजा हवा. रस काढण्यापूर्वी फळे किंवा पालेभाज्या धुऊन घ्याव्यात. मगच त्या सोलाव्यात. त्यानंतर ताबडतोब ज्यूसरमध्ये घालून त्यांचा रस काढावा. पटकन केल्याने त्यांचा हवेशी जास्त संपर्क येणार नाही व त्या रसामध्ये असणारे पौष्टिक घटक आपण प्राप्‍त करू शकतो. तयार केलेला रस लगेच प्राशन केला पाहिजे. तो जर बर्‍याच वेळपर्यंत तसाच ठेवला, तर त्यातील महत्त्वाच्या पोषक घटकांचा नाश होतो म्हणून एकदम जास्त रस काढून तो साठवून ठेवणेही अयोग्य आहे. जेव्हा रस प्यायचा असेल तेव्हाच काढावा. रसपान करण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. रस एकदम घटाघट न पिता, घोटाघोटाने हळूहळू प्यावा. तसे केल्याने रसामध्ये लाळ मिसळते व लाळेमध्ये असणारे अनेक पाचकरस रसामध्ये असणारी शर्करा पचवण्यास मदत करतात. त्यामुळे पोटात गेलेला रस 20-25 मिनिटांत पचतो. रोगनिवारणासाठी प्राशन करण्यात येत असलेल्या रसात साखर, मिरी किंवा मीठ घालू नये कारण त्यामुळे रस रुचकर लागला, तरी त्यातील पोषक घटकांवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो.
रसाहाराचा पूर्ण फायदा इच्छिणार्‍यांनी बाटल्यांमध्ये पॅक केलेले रस वापरू नये. कारण, अशा रसांवर प्रक्रियांमुळे व त्यांच्या संग्रहामुळे त्यातील सर्व पोषक घटक नष्ट होतात. म्हणून नेहमी ऋतुमानानुसार उपलब्ध असणार्‍या फळांचा किंवा पालेभाज्यांचा रस काढून पिणे हे रोगनिवारणासाठी व आरोग्यासाठी हितकर ठरेल.
नेहमी प्रसन्‍न चित्ताने रसाहार घ्यावा. अत्यंत श्रद्धेने व आशावादी वृत्ती ठेवून केलेला रसाहार अत्यंत परिणामकारक ठरतो. रसाहार घेत असताना अनेकवेळा शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस उचकी येणे, कधी उलटी येणे, ====
 पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे...
१.]   *कोथिंबीर* :-  उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.
२.]   *कढीलिंब* ;-  पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो.
३.]   *पालक* :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे.
४.]  *माठ*  :-  हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते.
५.]  *चाकवत* :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.
६.]   *हादगा* :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो. 
७.]   *अळू*  :-  याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते.
८.]  *अंबाडी* :-  मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो.
९.]  *घोळ* :-  मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते.
१०.]  *टाकळा* :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे.
११.] *मायाळू* :-  अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात.
१२.]  *तांदुळजा* :-  बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते.
१३.]  *मेथी* :-  सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो.
१४.]    *शेपू* ;-  वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे.
१५.]    *शेवगा* ;-  ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात.
१६.]     *सॅलड* :-  या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्‍यांनी नियमित सॅलड खावे
शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*
किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये
                   उपाय
     कोथींबीर  घ्या बारीक चिरुन घ्या.  पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
      किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.
==============
ऋतूनुसार आहार कसा घ्यावा 

प्रत्येकाच्या आहार निश्चितच फरक असतो. कोणत्या ऋतूत कोणती भाजी खावी, याबाबत अनेकांना माहिती नसते. आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कोणत्या, कुठल्या ऋतूत खाव्यात, याविषयी खाली माहिती देत आहोत.
उन्हाळ्यात काय खावे खाऊ नये
कांदा, लसूण, बटाटा, सुरण, रताळे, बीट यांसारख्या कंदभाज्या उन्हाळ्यात खाणे हितकारक असते. मधुमेहींनी बटाटा, रताळे, बीट मात्र वर्ज्य करावेत.
पावसाळ्यात काय खावे, खाऊ नये
भेंडी, ढोबळी, वांगी, टोमॅटो, यांसारख्या फळभाज्या पावसाळ्यात खाणे योग्य ठरेल.
या भाज्या कॅन्सरप्रतिरोधी अँटिऑक्‍सिडंट असल्याने फायदेशीर, परंतु ज्यांना किडनी विकार आहेत त्यांनी हे न खाणेच उत्तम.
लाल, दुधी भोपळा, कारले, पडवळ, दोडका या वेलभाज्या उन्हाळा आणि पावसाळ्यात खाव्यात.
स्थूल, बैठी जीवनपद्धती असलेल्या, स्तनदा महिलांना, धमनीविकार असलेल्यांना, वयस्कर लोकांना या भाज्या खाणे जास्त उपयुक्त ठरेल.
हिवाळा आणि उन्हाळ्यात पालेभाज्या फायदेशीर
मेथी, पालक, शेपू, राजगिरा, माठ या पालेभाज्या हिवाळा आणि उन्हाळ्यात खाणे फायदेशीर असते.
मलविरोध, ऍसिडिटी, स्थूल, गर्भवती व बैठी जीवनपद्धती असणाऱ्यांनी पालेभाज्या आवर्जून खाव्यात. किडनी विकार असणाऱ्यांनी मात्र या भाज्या टाळाव्यात.
हिवाळ्यात काय खावे, खाऊ नये
शेवगा, मटार, घेवडा, गवार, वाल- पावटे अशा शेंगभाज्या खाण्यासाठी हिवाळा योग्य ऋतू आहे.
गॅसेस, मलावरोधाचा त्रास असणाऱ्यांनी मात्र या अजिबात खाऊ नये. हायकोलेस्टेरॉल, उच्चरक्तदाब, मधुमेहींना या भाज्या खाणे फायदेशीर ठरेल.
===================
निवडक लेख  औषधाविना उपचार : पालेभाज्या खा, पण…! वैद्य प. य. खडीवाले वैद्य - 
पालेभाज्या खा असे मुलांच्या कानीकपाळी ओरडून सांगितले जात असते. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आहारात पालेभाज्यांचे स्थान मर्यादित आहे. म्हणूनच पालेभाज्या खाताना विशेष काळजीही घ्यायला हवी.
सर्व खाद्यपदार्थात पाने, फुले, फळे, कांड, कंद हे क्रमाक्रमाने अधिक बलवान आहेत. अधिक सुशिक्षित मंडळी आधुनिक आहारशास्त्र वाचून आपल्या मुलाबाळांकरिता पालेभाजी खाण्याचा आग्रह करीत असतात. तो आग्रह अतिशयोक्तीचा नसावा. धान्ये, कडधान्ये, फळे, दूध, मीठ, मांस, फळभाज्या, तोंडलावणी या अनेक प्रकारच्या अन्नपदार्थाचे प्रत्येकाचे काही खास वैशिष्टय़ आहे.
नुसती भाजी किंवा पोळी किंवा भाकरी खाऊन पोट भरेल; पण नुसत्या पालेभाज्या खाऊन किंवा त्यांचा रस पिऊन पोट भरणार नाही. पालेभाज्यांचे आहारात मर्यादित काम आहे. त्याकरिता त्या मर्यादा आपण समजावून घेणे आवश्यक आहे.
पालेभाज्या या अल्पायू आहेत. त्यांची वाढ दहा-पंधरा दिवसांत किंवा जास्तीत जास्त तीन आठवडय़ांत होते. या काळात त्यांनी जमीन, पाणी किंवा वातावरणातून घेतलेला जीवनरस हा असाच अल्पायू, कमी आयुष्य देणारा असतो. धान्ये, फळे, कंद यांच्यामध्ये त्या त्या द्रव्यांचा परिपोष झालेला असतो. तसे पालेभाजीत नाही. पालेभाजी शरीराला स्थैर्य देऊ शकत नाही. तरीपण जेव्हा विविध डॉक्टर मंडळी कॅल्शिअमच्या कमतरतेकरिता, कॅल्शियम गोळय़ा घ्यायला सांगतात, तेव्हा त्यांना पर्याय म्हणून पालेभाज्यांचा वापर करून शरीरात कॅल्शिअमची अपेक्षित वाढ होते का हे जरूर पाहावे.
पालेभाज्यांतील दुसरा दोष म्हणजे त्यांची उंची लहान असते. त्यामुळे त्यांचा जमिनीतील मातीशी जास्त संपर्क येतो. पालेभाजीच्या पानांमध्ये हजारो बारीक बारीक अतिसूक्ष्म जंतू असण्याची शक्यता असते. आपण मेथी, कोथिंबीर, चुका, चाकवत यांची गड्डी आणतो, धुतो, चिरावयास घेतो. स्वयंपाक करणारी मंडळी कटाक्षाने प्रत्येक पान न पान स्वच्छ धुऊन भाजी करीत असतील का? त्यामुळे खराब पाणी पिऊन ज्यांना कृमी, जंत, आमांश, पोटदुखी, जुलाब, उलटय़ा, उदरवात हे विकार नेहमी नेहमी होत असतात, त्यांनी पालेभाज्या काळजीपूर्वक निवडून स्वच्छ करूनच खाव्यात. पोटाची तक्रार असणाऱ्यांनी पालेभाजी टाळलेली बरी. खायचीच असेल तर त्यासोबत आले, लसूण, जिरे, मिरी, सुंठ, हिंग, मोहरी यांचा वापर असावा.
पालेभाज्यांतील आणखी एक दोष म्हणजे लघवी कमी होणे. लघवीची आग होणे, लघवी कोंडणे या तक्रारी असणाऱ्यांनी पालेभाज्या खाऊ नयेत. पालेभाज्यांत एक प्रकारचे क्षार असतात. चाळिशीच्या वर वय झालेल्या व्यक्तींना लघवीचा त्रास असला तर लघवीवाटे हे क्षार बाहेर टाकणे अवघड असते.
आयुर्वेदात फार प्राचीन कालापासून पथ्यकर व कुपथ्यकारक असे आहारपदार्थाचे केलेले वर्गीकरण ग्रंथात आढळते. या वर्णनात सांगितलेल्या काही वनस्पती आता मिळत नाहीत. कालौघात काही वनस्पती नाहीशा झाल्या. यातही बदल झाला असेल. पुणे-मुंबई व कोकण किंवा देशातील लहानमोठय़ा शहरांत भिन्न-भिन्न प्रकारच्या पालेभाज्यांचे खूपच प्रकार आढळतात. आताच्या संदर्भात सर्वत्र सहज मिळणाऱ्या पालेभाज्यांचा विचार आपण करीत आहोत.
वासनवेल (पाठा) कचोरा, कुरडू, विष्णुक्रांता, चाकवत, दुधी या भाज्या पथ्यकर, पचायला हलक्या व त्रिदोषहारक आहेत. कुरडूची भाजी दुबळेपणा दूर करते. चाकवत सारक आहे. पडवळ, शिकेकाई, कडुनिंब, सागरगोटा, बावची, गुळवेल, वेताची पाने, रिंगणी, डोरली, अडुळसा, ब्राह्मी, रानतीळ, करटोली, कारले, पित्तपापडा, वांगे, पुनर्नवा, दोडका या सर्वाची पाने मलावष्टंभ, वातूळ, पित्त कमी करणारी, थंड, चवीने कडू व वजन घटविणारी आहेत. आयुर्वेदात जिवंती ही सर्वश्रेष्ठ तर मोहरी सर्वात कनिष्ठ पालेभाजी मानली आहे.
अळू
अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे रक्त वाढवणारी, ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. बाळंतिणीस दूध कमी येत असल्यास अळूची भाजी भरपूर खावी. भाजीकरिता पाने व देठ दोन्हींचा उपयोग करावा. अळूच्या पानांचा रस व जिरेपूड असे मिश्रण पित्तावर उत्तम गुण देते. फुरसे किंवा अन्य विषारी प्राणी चावले असताना वेदना कमी करण्याकरिता अळूची पाने वाटून त्यांचा चौथा थापावा व पोटात रस घ्यावा. गळवे किंवा फोड फुटण्याकरिता अळूची देठे वाटून त्या जागी बांधावी. गळू फुटतात.
अंबाडी
अंबाडी ही पालेभाजी रुचकर आहे; पण डोळय़ाचे विकार, त्वचारोग, रक्ताचे विकार असणाऱ्यांनी वापरू नये. अंबाडी खूप उष्ण आहे, तशीच ती फाजील कफही वाढवते.
करडई
करडई पालेभाजी खूप उष्ण आहे. चरबी वाढू नये म्हणून याच्या तेलाचा उपयोग होतो. तसेच याची पालेभाजी वजन वाढू देत नाह
==========


भाज्यांचे औषधी महत्व :
हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. या पालेभाज्यामध्ये क्लोरोफील नामक घटक मोठ्या प्रमाणात असतो. शरीरात असणाण्या विषाणूंवर ते हल्ला चढवून नष्ट करत असतात. पालेभाज्यांमध्ये विविध गुण असतात. शरीरासाठी ते उपयुक्त ठरतात.
पालक-
आपल्या रोजच्या आहारात पालकाचा समावेश केल्याने शरीरात रक्तवृध्दी होते. रक्त शुध्द होते तसेच हाडे मजबूत होतात. 'क' व 'ब' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असल्याने शरीर तंदरूस्त राहण्यास ते अधिक लाभदायी असतात. पालकमध्ये सल्फर, सोडियम, पोटॅशियम व अमिनो एसिडही असते.
मेथी-
मेथीची भाजी ही वातनाशक असून खोकला व तापावर उत्तम औषध आहे. मेथीचे दररोजच्या आहारात सेवन केल्याने कमरेचे दुखणे दूर होते. शारीरिक शक्ती वाढते. या भाजीत 'अ' जीवनसत्त्व, कॅल्शियम, प्रोटीन्स तसेच कार्बोहायड्रेडचे प्रमाण अधिक असते.
मोहरी-
हिरव्या मोहरीला उत्तर भारतात सरसो म्हटले जाते. या भाजीत लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आदी घटक असतात. मात्र ती प्रकृती बाधक आहे. त्यामुळे सरसोच्या भाजीत लसणाचा वापर केला पाहिजे.
चवळी-
चवळीच्या शेंगा तंतुयुक्त असतात. त्यामुळे त्या पचायलाही उत्तम असतात. त्यामुळे पोट साफ रहाते. चवळीच्या शेंगाची भाजी महिलांसाठी पौष्टीक असते. डोळ्यांची जळजळ दूर करण्यासाठी तसेच शररीरातील उष्णता कमी करण्यासाठी चवळी फायदेशीर असते. त्यात 'अ', 'ब', 'क' जीवनसत्त्व तसेच कार्बोहायड्रेट व कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते.
सोयाबिन-
सोयाबिनचा वापर पालकाच्या भाजीत केला जातो. सोयाबिनच्या हिरव्या पानांची भाजी शरीरासाठी उपयुक्त असते. खोकला, पोटाचे आजार तसेच वातविकार दूर करण्याचे गुण सोयाबिनमध्ये असतात. 'अ' जीवनसत्त्वाने भरपूर असलेले सोयाबिन पोटातील गॅस बाहेर काढतो. मुळव्याध झालेल्या नागरिकांसाठी सोयाबिनच्या
====
विविध प्रकारची जीवनसत्त्वे मिळण्यासाठी पालेभाज्या आहारात असणे योग्य. विविध वयोगटांतील व्यक्तींसाठी पालेभाज्या उपकारक ठरतात. पालेभाज्यांचा आहारातील वापर अनेक रोगांना प्रतिबंध करणारा आहे. पालेभाज्या करताना काळजी घेतली आणि त्याचा आवश्‍यक तेवढा वापर केला, तर दूध आणि मांसाहारातून मिळणारे घटक पालेभाज्यांतूनही काही प्रमाणात मिळू शकतात.
आपल्याकडे महाराष्ट्रात वर्षभर विविध पालेभाज्या मिळत असतात. सामान्यत: पालक, मेथी, शेपू, अळू, आंबटचुका, अंबाडी, राजगिरा, माठ, चाकवत, करडई, चवळी, कांद्याची पात अशा विविध प्रकारच्या भाज्या राज्याच्या कानाकोपऱ्यांत खाल्ल्या जातात. स्थानिक पालेभाज्या ही असतात. ज्या फक्‍त, त्या त्या भागातच माहीत असतात. उदा. भारंगीची भाजी. पालेभाजी कोणतीही असो, तिचे आरोग्यदायी फायदे खूप आहेत. शहरातील मंडळींमध्ये पालेभाजी खाण्याचे प्रमाण कमी आहे, खरं तर ही खेदाची गोष्ट आहे. कारण शहरी जीवनशैलीसाठी या भाज्या आवश्‍यक आहेत. अत्यंत कमी उष्मांक, भरपूर चोथा व पोषकतत्त्वांनी खच्चून भरलेल्या या भाज्या जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करतात.
प्रत्येक भारतीयाने रोज किमान 50 ग्रॅम (1/2 वाटी) पालेभाजी खावी, अशी शिफारस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने केली आहे. शाकाहारी व्यक्‍तींनी लोह या महत्त्वाच्या क्षारासाठी रोज 100 ग्रॅम (1 वाटी) पालेभाजी खावी. ज्यांच्या आहारात दुग्धजन्य पदार्थ कमी आहेत व मांसाहाराचेही प्रमाण कमी आहे, अशा व्यक्‍तींनी कॅल्शियमसाठी रोज पालेभाजी खाणे गरजेचे आहे. या भाज्यांमधील लोह व कॅल्शिअम या क्षारांचे व्यवस्थित शोषण व्हावे, यासाठी पालेभाज्यांबरोबर ताक, लिंबू किंवा एखादे आम्लधर्मीय फळ खावे. पालेभाज्या करण्याच्या पद्धतीतही प्रांताप्रांताप्रमाणे फरक आहे. पीठ पेरून, शेंगदाण्याचे कूट घालून तसेच डाळीबरोबरची पालेभाजी, ताकातली पालेभाजी अशा विविध पद्धतीने गृहिणींकडून पालेभाज्या केल्या जातात. पालेभाजी करताना तेलाचा वापर अगदी कमी ठेवावा. लसूण-कांदा-हिंग मात्र सढळ हाताने वापरावे. पाण्याचा वापरही गरजेपुरताच ठेवावा. पालेभाजी लोखंडाच्या कढईत केल्यास ती लगेच अन्य पातेल्यात काढून ठेवावी. पालेभाजी ही ताजीच खावी. शिजवलेली भाजी पुन्हा पुन्हा गरम करू नये. यामुळे यातील महत्त्वाची जीवनसत्त्वे कमी होतात.
मांसाहारी मंडळी कधी कधी पालेभाजीमध्ये सुकी मासळी (सुकट, सोडे) घालतात. अशी भाजी हाडांसाठी खूपच उत्तम. बारीक अंगकाठी, खूप शारीरिक मेहनत करणारे व खेळाडूंसाठी अशी भाजी फायदेशीर ठरते. पालेभाज्यांचे देठ पौष्टिक असतात. शक्‍य तेव्हा कोवळ्या देठांचा, कोशिंबीर व रायत्यामध्ये खुबीने वापर करावा. पालेभाजी कोवळी असल्यास देठासह चिरून त्याची भाजी करावी. ज्यांना कोलेस्टेरॉलचा त्रास आहे व ज्यांचे पोट साफ होत नाही अशांनी पालेभाजी देठासह खावी.
पालेभाज्यांमध्ये काही समान गुणधर्म आहेत ते असे
1) पालेभाज्यांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आहेत. फॉलिक ऍसिड हे त्यातील महत्त्वाचे जीवनसत्त्व, गर्भवती महिलांनी रोजच्या रोज वाटीभर निरनिराळ्या पालेभाज्या खायला हव्यात. कारण पालेभाज्यांमध्ये असणारे फॉलिक ऍसिड पहिल्या तीन महिन्यांत गर्भातील बाळाच्या मेंदूची वाढ योग्य प्रमाणात होण्यासाठी गरजेचे असते.
2) आपल्या आहारात यकृत, दूध, अंडे असे प्राणिज पदार्थ कमी असल्यास "अ जीवनसत्त्व' देणाऱ्या पालेभाज्या नियमितपणे खाव्यात. "अ' जीवनसत्त्व हे त्वचा व डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे.
3) पालेभाज्यांमधील "क' जीवनसत्त्व रोगप्रतिकारक्षमता वाढवते. हे जीवनसत्त्व पाण्यात विरघळत असल्याने पालेभाज्या कापण्यापूर्वीच धुवाव्यात, तसेच उघड्या भांड्यात न शिजवता झाकण ठेवून कमीत कमी पाण्यात शिजवाव्यात.
4) गरीब लोकांना दूध-दुभते, मांसाहार, डाळी आदी पौष्टिक पदार्थ परवडत नाहीत. अशा वेळी कमी खर्चात पालेभाजी खाऊन विविध जीवनसत्त्वे मिळवता येतात.
5) पालेभाज्यांत कोलेस्टेरॉल नसते. चरबीची मात्रा दोन टक्‍क्‍यांहून कमी असते. वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी एका जेवणात तरी पालेभाजी-भाकरी घ्यावी.
6) पालेभाज्यांमध्ये लायनोलेनिक ऍसिड हे अत्यंत आरोग्यदायी असे ओमेगा- 3. फॅटी ऍसिड आहे. अक्रोड, मासळी, मोहरी असे काही ठराविक घटक पदार्थ वगळता ओमेगा - 3 नैसर्गिक स्वरूपात कोठेच मिळत नाही. आपल्या रोजच्या आहारातील तेलांमुळे ओमेगा - 6 या फॅटी ऍसिडचे शरीरातील प्रमाण खूपच जास्त असते. यामुळे रक्‍तवाहिन्यांचे आजार होण्याची शक्‍यता वाढीस लागते. ओमेगा - 3 या घटकाचे प्रमाण शरीरात वाढविल्यास हे दुष्परिणाम बऱ्यापैकी कमी करता येतात. पालेभाज्या ओमेगा - 3 शरीरास देत असल्याने महत्त्वाच्या आहेत.
7) पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चौथा (फायबर) असतो. ज्यांना शौचास साफ होत नाही, ज्यांची बैठी जीवनपद्धती आहे.
===
जीवनसत्त्वे व खनिजे भाज्यांत, पालेभाज्यांत मुबलक प्रमाणात असतात. मात्र प्रत्येक भाजीत त्यांचे प्रमाण वेगवेगळे असते. भाज्यांत प्रामुख्याने कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम व आयोडिन ही खनिजे असतात.
- माठ, मेथी, शेवग्याचा पाला यामध्ये कॅल्शियम आढळते. स्नायूंच्या कार्याकरिता हाडे, दात बळकटीसाठी, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी कॅल्शियमची आवश्‍यकता असते.
- मेथी, माठ, आळू, कोथिंबीर, लाल माठ अशा अनेक पालेभाज्यांत लोह असते. रक्तक्षय असणाऱ्यांनी हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी पालेभाज्या अधिक खाणे आवश्‍यक आहे. सोडियम, पोटॅशियम, आयोडिन, कोबाल्ट, मॅंगेनिज, झिंक वगैरे शरीरात आवश्‍यक असणारी खनिजे प्रामुख्याने पालेभाज्यांतच असतात.
कोणत्या भाज्या कुणी खाव्यात?
प्रत्येक व्यक्तीने रोज 100 ते 125 ग्रॅम पालेभाज्या, भाज्या खाण्याची आवश्‍यकता आहे.
- माठ, पालक, आळूची पाने, मुळ्याचा पाला, कोबी, शेपू, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, गाजर या भाज्यांमध्ये "अ' जीवनसत्त्व असते. सर्व प्रकारच्या पालेभाज्यांमधून शरीरास "ब' जीवनसत्त्व मिळते. जखमा भरण्यास, उत्साह आणि तरतरी येण्यास, तसेच त्वचा सुंदर व टवटवीत ठेवण्यात "क' जीवनसत्त्व उपयोगी असते. ताज्या पालेभाज्यांतून शरीरास "क' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात मिळते.
- रक्तदाब (ब्लडप्रेशर) जास्त असणाऱ्या व्यक्तींनी करडई, पालक, मुळ्याची पाने, पुदिना, राजगिरा, चवळी यासारख्या सोडियम असणाऱ्या भाज्या अल्प प्रमाणात खाव्यात.
- आम्लपित्त असणाऱ्यांनी मेथी, पुदिना, कोथिंबीर या भाज्या कमी प्रमाणात खाव्यात.
भाज्या का महत्त्वाच्या?
- आपल्या पेशींमधील चयापचयाच्या क्रियेमधून शरीरात घातक अशी विषारी द्रव्ये तयार होतात, त्यांना "ऑक्‍सिडंट्‌स' असे म्हणतात. त्यामुळे पेशींचे कार्य हळूहळू बिघडू लागते. परिणामी, शरीर लवकर थकते, आयुर्मर्यादा कमी होते, अकाली वृद्धत्व येते. हे सर्व टाळण्याकरिता पालेभाज्या व फळे खाल्ल्यास या घातक द्रव्यांचा नाश होतो. द्रव्यांच्या विरुद्ध कार्य करणारी "अँटिऑक्‍सिडंट' कार्यरत राहतात. शरीर निरोगी राहण्याकरिता, दीर्घायुष्य लाभण्याकरिता पालेभाज्या आहारातून अवश्‍य खाव्यात.
रानभाज्यांचे फायदे...
- पालेभाज्यांच्या लागवडीसाठी मशागतीपासून अनेक क्रिया कराव्या लागतात. त्या तुलनेत पावसाळ्यात रानभाज्या आपोआप उगवतात. लागवड व देखभाल खर्च करावा लागत नाही.
- रानभाज्यांची नैसर्गिक चव स्थिर असते. सशक्त असलेल्या रानभाज्यांवर रोगांचा, किडींचा प्रादुर्भाव झालेला नसतो. यामुळे रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने निश्‍चितच जास्त उपयुक्त आहेत.
काय करता येईल रानभाज्यांसाठी...
- पिढ्यान्‌पिढ्या वापरल्या जाणाऱ्या रानभाज्या, विशिष्ट हंगामात येणाऱ्या जंगली वनस्पती आपल्या आहारातून कालबाह्य झाल्या असून, सगळीकडे फ्लॉवर, कोबी, बटाटा, दुधी भोपळा, टोमॅटो याच भाज्यांची रेलचेल आहे.
- शहरातीलच नव्हे, तर खेड्यापाड्यांतील लोकही रानभाज्यांची ओळख पूर्णपणे विसरून गेले आहेत. त्यामुळे भाज्या ओळखण्यापासून ते सरस अशा पाककृती तयार करण्यापर्यंत व पुढे त्यांचा प्रसार करण्यापर्यंत मोठ्या कामाची आवश्‍यकता आहे. त्यामुळे...
- ऍनिमिया, मधुमेह, स्थूलपणा, मासिक पाळीच्या तक्रारी हे विकार दूर ठेवता येतील.

धन्यवाद !!!

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे
(संग्राहक; सचिन देसाई )

Thursday 1 December 2016

निवडक कवितासंग्रह : इयत्ता ५ वी (मराठी )





अ .क्र.

कवितेचे  नाव 

संदर्भ माहिती  

क्लिक करा 

 1

 माय मराठी 

गद्यपाठ  क्र.१ 

कवयत्री: संजीवनी मराठे (पान क्र.१ )

DOWNLOAD

2

 वल्हवा रं वल्हवा  

  गद्यपाठ क्र.३ 

कवी :वसंत बापट  (पान क्र.७) 

सौजन्य ; प्रविण डाकरे  

DOWNLOAD

 ३ 

माहेर 

गद्यपाठ क्र.६

कवी सदाशिव माळी

(पान क्र. १६ ) 

DOWNLOAD

४ 

रंग जादूचे पेटीमधले  

 गद्यपाठ क्र. १० 

कवयत्री: पद्मिनी बिनीवाले 

(पान क्र.२९) 

DOWNLOAD

 ५  

सण एक दिन  

गद्यपाठ क्र. १३ 

कवी : यशवंत  

(पान क्र. ३८ )

DOWNLOAD

६ 

पुस्तके 

 गद्यपाठ क्र. १७ 

कवी: सफदर हाश्मी  

( पान क्र. ४८ )

DOWNLOAD

 ७ 

वासरू  

गद्यपाठ क्र.१९ 

कवी: अनिल 

( पान क्र. ५५ )

DOWNLOAD

८ 

प्रश्न विचारा पुन्हा 

 गद्यपाठ क्र. २१ 

कवयत्री: सुकन्या आगाशे

(पान क्र. ६५ )

DOWNLOAD

 ९ 

कापणी 

गद्यपाठ क्र. २४ 

कवयत्री: बहिणाबाई चौधरी 

(पान क्र.८२ )

DOWNLOAD