सुस्वागतम...माझ्या या शैक्षणिक ब्लॉगवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे......... WEL-COME ON MY BLOG .......

Saturday 8 February 2020

दिशा परिवर्तनाची...चरण १ ते ११



               २७/१२/२०१९
                                     शब्दांकन : सचिन देसाई     

१४ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर त्या ज्ञानमंदिरात फुलणार ज्ञानाची बाग़ !* ▪ *सर्व शिक्षा अभियान अंतर्गत बांधलेली पण  छत गळतीमुळे दशकहुन अधिक काळ बंद अवस्थेत असलेल्या वि.मं.बशाचामोळा शालेय इमारतीच्या जीर्णोद्धारास प्रारंभ !

🏤▪ अत्यावश्यक दुरुस्ती,शालेय सुविधा यांच्या परिपूर्तिसाठी ग्रामपंचायत, लोकसहभाग, युवा मंडळे याच्या सहकार्यातून 3 लाख पेक्षाही अधिक निधी उभारणार  

गेले चार दिवस सातत्याने चाललेल्या ग्रामस्थांच्या श्रमदान चळवळीतुन परिवर्तनच्या दिशेने पडले पहिले यशस्वी पाऊल!
                       साधारणपणे 2005/06 च्या दरम्यान विद्या मंदिर बशाचामोळासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत षटकोनी इमारत बांधण्यात आली पण दुर्दैव्याने छत गळती कारणांमुळे सुरवातीच्या केवळ ३/४ महिन्यातच बस्तान बसण्यापूर्वीच पुनः शाळा गावतील एका जुन्या कौलरु शाळाखोलीत आश्रयाला गेली. जी आजअखेर १४ वर्षे तिथेच एका जुन्या खोलीत अड़कली.  चार महिन्यापूर्वी *जुलैमध्ये जेव्हा आम्ही दोघेही शिक्षक जेव्हा नव्याने इथे हजर* झालो तेव्हा लक्ष्यात आली की, गुणवत्तापूर्ण विद्यार्थी असतानाही शालेय इमारत व भौतिक सुविधा यांची प्रमुख अडचण होती. ह्या अडचणी मुळे इतर जवळपास सर्व गोष्टीवर अन् प्रयत्नावर निश्चितपणे मर्यादा दिसत होत्या. शाळेला सुव्यस्थित *इमारत नसेल... क्रीडांगण नसेल मुलभुत सुविधा नसेल तर सर्वांगीण शिक्षण कसे देता येईल ?* शिवाय यासाठीच जी १४ वर्षापूर्वी नव्याने इमारत बांधली होती ती या तांत्रिक कारणांमुळे बंद अवस्थेत होती. सदर पूर्वइतिहास आम्हांस ज्ञात झालेवर सदर इमारत स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन प्राप्त परिस्थिति आम्ही दोघांनी जाणून घेण्याचे ठरवले.  गावतच एका बाजूला शेतीपरिसरात ती इमारत वसलेली होती. जवळ गेल्यावर लक्ष्यात आले की, *शाळेच्या आजुबाजुला इतकी झाडी-झुडपे वाढली होती की त्यातून वाट काढणे ही मुश्किल ! शेवटी एक कोयता घेऊन वाट काढत त्या खोली पर्यन्त पोहचलो व जुने कुलुप फोडून आत प्रवेश* करुन सद्य स्थिती पाहिली. छत गळती सोडली तर वास्तुची इतर कोणतीही मोठी नादुरुस्ती दिसत नह्वती. पण इतर समस्या वाढल्या होत्या... शौचालय-मुताऱ्या पूर्णतः कोलमडल्या होत्या,अजुबाजुला प्रचंड झाडी वाढली होती शिवाय इथे वापर व  वावर नसलेने या रिकाम्या स्थळी शेतीची खोपी..गंजी..इतर शेती साहित्य...लाकडे आदी.साहित्य लोकांनी ठेवले होते.त्यामुळे शाळेची नेमकी हद्द कशी आहे हे पण स्पष्ट समजत नह्वते. पण सध्या नवीन इमारत उभी करण्यापेक्षा आहे ही इमारत दुरुस्त करणे व वापरात आणणे व नंतर शेजारी यथावकाश दूसरी खोली उपलब्ध करणे हे योग्य दिसत होते. मग आमचे ठरले, काहीही करुन ही इमारत दुरुस्त करायचीच.
                 पुढील टप्प्यात शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांच्या बैठका घेवून समजावून सांगितले की, आज गाव इतके आर्थिक समृद्ध आहे.. मंदिर,सभामंडप आदि सर्व सुविधा विकासकामे आपण पूर्ण केलित *पण 'इथे गावतील प्रत्येक माणूस घडतो ते ज्ञानमंदिर मात्र विकासाच्या प्रतीक्षेत आहे !'* आणि ह्याचे गांभीर्य ओळखून प्रत्येकाने जबाबदारी उचलली पाहिजे,सहकार्य..योगदान दिले पाहिजे. सदर पूर्तिसाठी आर्थिक पाठबळ लागणार होते यासाठी *मा. प्रकाश कांबळे या कार्यतत्पर सरपंचाना विशेष बैठक बोलावून विषय मांडण्यात आला. सरपंचांनी तात्काळ वित्त आयोग मधून सर्वोतोपरी निधि देण्याचे व या कामी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले* व आज अखेर पाळले.       या नंतर पुढील कार्यवाही साठी शा व्य समितीच्या नियंत्रणाखाली बैठका घेतल्या समस्या व नियोजन याचा आढावा  घेतला. इतर आर्थिक सहकार्यासाठी आवाहन करण्यात आले यावर सर्वानी सकरत्मकता दाखवली.. *इतकेच काय गावतील युवा क्रिकेट क्लब मधील युवकांनी या उपक्रमास प्रोत्साहन म्हणून या वर्षीच्या स्पर्धेतील नफ्याचे १५ हजार शाळेच्या कामासाठी सुपुर्त करुन एक नवा आदर्श निर्माण* केला.  पण अजुन अनेक समस्या पुढे शिल्लक होत्या... झाड़ी काढणे, परिसर साफ करणे, शालेय आवारात जो वावर झाला होता तो मागे घेणे अत्यावश्यक होते यासाठी सबंधित लोकांना विनंती करण्यात आली.. लोकांनी गावाचा व मुलांच्या शिक्षणाचा विचार करुन याला अनुकूलता दर्शविली. काही प्रसंगी विषय संवेदनशीलही बनला.यावेळी हद् निश्चितीवरून वाद- विवाद होवू नये यासाठी गावातील स्थानिक शिक्षक,शिक्षणप्रेमि तसेच प्रतिष्टित नागरिक यांची विशेष ग्रामसभा बोलवुन विषय निर्विवाद सुटन्यासाठी प्रयत्न करण्यात आले. बऱ्यापैकी या प्रयत्नास यश मिळाले विवादित अल्पभूमीवरील काम सरकारी निर्देशच्या निर्णयापर्यंत प्रलंबित ठेवून निर्विवादीत जागेवर काम करण्याचे सर्वानुमते ठरले.  पुढील कामास गती येण्यासाठी *'एक दिवस शाळेसाठी-श्रमदान चळवळ'* हा कार्यक्रम आयोजित करुन मागील *४ दिवसात  गावतील सर्व ग्रामस्थ व युवा वर्ग यांच्याकडून शालेय आवर साफ सफाई* करण्यात आली. यंत्राचा वापर करुन जमिनीचे योग्य सपाटीकरण करण्यात आले.           या प्राथमिक संघर्षमय पायरीनंतर पुढ़ील व्यापक प्रयत्नामधुन *या ज्ञानमंदिरास एक नवी दिशा..नवा आकार देण्याचा एक मानस... एक संकल्प .. एक पवित्र निर्धार समस्त ग्रामस्थांच्या अनुबंधातुन व योगदानातुन साकारतोय...याचा आनंद होतोयच...! शिवाय 'आपण साद घातली तर हमखास प्रतिसाद मिळतोच !' हा अमूल्य बोध दृढ झाला.* आमच्या निर्धारास... शैक्षणिक कार्यास सहकार्य करण्याऱ्या समस्त ज्ञात-अज्ञात व्यक्ति जणांचे मानापासून आभार !🙏🙏🙏💐💐💐

----------------------------------******************************--------------------------------

*दिशा परिवर्तनाची* 9/02/2020
शब्दांकन : सचिन देसाई     
                 चरण *3* रे*
*माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक व श्रमिक योगदानातून शालेय इमारत रंगकामास प्रारंभ !
              या शैक्षणिक सत्रात वि.मं.बशाचामोळा ता.भुदरगड येथे गेली १४ वर्षे बंद अवस्थेत असलेल्या शालेय इमारत नुतनीकरणाचा संकल्प शाळा व ग्रामस्थ यांच्या सयुंक्त योगदनातून वाटचाल करत आहे.  यातील *पहिल्या टप्यात:-* सर्व गावकऱ्यांच्या श्रमदान चळवळीतून भोवतालची झाडी, झुडपे आवर सफाई करण्यात आली. यंत्राच्या सहाय्याने जमीन सपाटीकरण केले. *दुसऱ्या टप्यात:-* ग्रामपंचायत मठगांव यांच्या सौजन्याने पावडर कोटेड पत्र्याचे आच्छादन करुन गळतीवर रामबाण उपाय करण्यात आला. आता *तिसऱ्या टप्यात:-* इमारत रंगकाम करण्याचे योजले.     गावातील युवकांनी 15 हजार मंडळातर्फे भेट दिल्यामुळे रंगकाम सुरु करणे सुकर झाले होते पण यातही अनेक बिकट समस्या उभ्या होत्या. *मागील १४ वर्षात गर्द झाडीत लपलेली इमारत कळकट..मळकट झाली होती..सर्वत्र शेवाळ चढले होते...खोल्यांच्या आत माती व कचऱ्याचे ठिग साचले होते.* या सर्वांची योग्यव्यवस्था लावणे रंगकाम पूर्वतयारी साठी आवश्यक होते. यासाठी पुनः गावातील युवा वर्गाला म्हणजेच माजी विद्यार्थ्यांना मदतीसाठी हाक दिली. *नेहमीप्रमाणे तात्काळ प्रतिसाद देत गावातील युवकांनी लोखंडी ब्रश,पत्रा झाड़ू ख़राटा आदी सहित्याद्वारे सर्व भिंती आतून बाहेरून घासुन काढल्या.* त्यानंतर अरविंद पाटील यांच्या *शेतातील मोटरीचे पाणी पाइप ने शाळेपर्यत आणले.सर्व शाळा रंगकामापूर्वी धुवून स्वच्छ केली.*      *SMC अध्यक्ष विश्वनाथ पाटील व उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी पदाचा कोणताही मोठेपणा न मिरवता मनाचा मोठेपणा दाखवत दिवसभर हातात सफाइचे साहित्य घेवून सर्व इमारत घासुन व धुवून काढण्यात मोठी मदत* केली. एक नवा आदर्श उभा केला. शेवटी इमारतीची *किरकोळ दुरुस्ती व डागडुज्ज़ी करायची होती. याच शाळेत शिकलेला व बांधकामाची माहिती असलेल्या स्वप्निल उर्फ़ मुन्ना सुतार याने ही कामे करुन दिलीत*. आणि साध्या रंगकामास सुरवात झालीय ! *कित्येक वर्षानी कुंचल्याच्या स्पर्शाने प्रफ्फुलित होवून तेजोमय झालेली ...ती अंतरंगातुन बहरल्याची दिसत होती!...चिमण्या पाखरांना कवेत घेण्यासाठी असुरलेली भासत होती. पुढील अंतरंग बहिरंग यासाठी अजुन बराच निधी उपलब्ध होणे गरजेचा आहे. यासाठी आम्ही *शनिवारी गावातील हनुमान मंदिरात गंगा पूजनास सर्व ग्रामस्थ जमले असताना सदर विषय मांडून आर्थिक सहकार्यासाठी आवाहन करण्यात आले या प्रसंगी आमचे मार्गदर्शक एकनाथ पाटील सर व बी ए पाटील सर यांनी पुढाकार घेतला. सर्व लोकांनी देखील प्रत्येक घरातून यथाशक्ति सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन* दिले.     आज अनेक गावतील नवी पिढी डॉल्बी,मिरवणुका अनावश्यक ख़र्च, टाइमपास यात रंगली असताना या छोट्या गावातील मुलांनी एक चांगला आदर्श सर्वासमोर निर्माण करत आहे या बद्दल अभिनंदन ! लोकसंख्या 500 हुन कमी, पट 22 इतकी मर्यादित शक्ति असतानाही शाळा समिती व ग्रामस्थ यांच्या उच्च क्षमतेच्या बळावर अनेक मोठ्या संकटांना व संघर्षाला सामोरे जात आज इथेपर्यत पोहचलो. आमच्या संकल्पाला..आमच्या ध्येयाला सहकार्य करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्वाचे आभार !

----------------------------------******************************--------------------------------

27/02/2020, 20:34 - Sachin Desai 
*सामाजिक बांधिलकी जपत श्री. संपत आनंदराव देसाई (गारगोटी-सोनाळी) यांनी साजरा केला आगळावेगळा वाढदिवस !*
*भुदरगड येथील 'बशाचामोळा' या छोट्या खेड़ेगावातील शाळेत उपस्थित राहून शाळेच्या प्रगतीकार्यास शुभेच्छापर 5000/-रु ची आर्थिक व वस्तुरूप मदत करुन दिला प्रेरक आदर्श !*
*मा.संपतराव आपल्या वाढदिवसाबद्दल अन् संवेदनशीलतेबद्दल आपणास लाख लाख शुभेच्छा !*    
           "ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपणास काहीतरी देणे लागते !" या विचारांची माणसे आज आपल्या सभोवताली आहेत म्हणून समाज आज टिकून आहे. समाज योग्य दिशेने वाटचाल करत आहे. याच विचारधारेला जपणारे एक समाजशील व्यक्तित्व म्हणजे गारगोटी-सोनाळी येथे राहणारे मा.संपत आनंदराव देसाई साहेब. आज 27 फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस होता. डिजिटल पब्लिसिटी अग़र आनावश्यक खर्च या गोष्टींना फाटा देत समाजशील पद्धतीने कार्य करण्याची त्यांची दातृत्वमय वृत्ती आजअखेर  सर्वांनी पाहिली आहे.यावर्षी देखील त्यांनी ती अखंडित जपली...एका ज्ञानमदिरास सहकार्य करुन. भुदरगड़ तालुक्याच्या पश्चिम टोकाशी असणाऱ्या 30 km दूर 'बशाचामोळा' या छोट्याश्या गावात शाळा व ग्रामस्थ यांच्या सयुंक्त योगदानातून चाललेल्या प्रयत्नवादी चळवळीची बातमी त्यांना समजली; शिवाय याबाबतचे व्हिडिओ देखील त्यांनी यु ट्यूब वर पाहिले आणि त्यांनी या शाळेत वाढदिवसादिवशी उपस्थित राहून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. आज आमच्या बशाचामोळा या शाळेत त्यांचा वाढदिवस मुलांच्या समवेत साजरा करण्यात आला.यावेळी SMC सदस्य , पालक, ग्रामस्थ ही उपस्थित होते. मा.संपत देसाई यांनी 5000/-रु ची शाळेस भेट दिली. प्रसंगी मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या शाळेच्या परिवर्तनासाठी चाललेली संघर्षवादी धडपड पाहून महाराष्ट्रातील अनेक शिक्षक मित्रांकडून 50,000/- हुन अधिक रक्कम शाळेस भेट म्हणून ऑनलाइन स्वरुपात या आठवड्यात प्राप्त झाली आहे. संपतराव आपल्या कृतीतून प्रेरणा घेवून आपणासारखे अनेक दाता छोट्या वाडीतील खेडयातील शेतकऱ्याच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतिसाठी विकासासाठी पुढे येतील हीच मनोकामना !_     _आपल्या अनमोल सहकार्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत ! आपले खुप खुप अभिनंदन व आभार !_🙏🙏

----------------------------------******************************--------------------------------

3/03/2020
शब्दांकन : सचिन देसाई     

    *'दुबई' येथे वास्तव्यास असलेल्या कासम शेख यांनी विद्या मंदिर बशाचामोळा शाळेस दिली आर्थिक स्वरुपात शुभेच्छा भेट !
      शाळा व ग्रामस्थ यांच्या संयुक्त योगदानातून आम्ही परिवर्तनाची एक नवी दिशा निर्माण केली. एका छोट्या खेड्यातील ही शैक्षणिक जागृती पाहून कोणतीही मागणी न करता महाराष्ट्रातील अनेक शिक्षकमित्रांनी हजारो रुपयांची मदत ऑनलाइन स्वरुपात पाठवली. सदरची संघर्षमय व प्रेरणादायी वाटचाल पाहून सामाजिकभान अन संवेदनशील मन असणाऱ्या श्री. संपत देसाई (सोनाळी) यांनी आपला वाढदिवस दोन दिवसापूर्वीच या शाळेत साजरा करुन आर्थिक स्वरुपात मदत केली होती.     सोशल मीडियामुळे सदरची बातमी संपत देसाई यांचेच मित्र  सध्या दुबईत असणारे कासम शेख यांनी समजली. शेख तसे मूळचे अनफ खुर्द गावचे पण कामामुळे ते सध्या दुबई येथे वास्तवास असतात. आपल्या गावाशेजारी चाललेल्या या शैक्षणिक प्रगतीचा त्यांना अभिमान व आनंद वाटला लागलीच त्यांनी आम्हा शिक्षकांचा संपर्क क्र. घेवून अभिनंदन केले शिवाय चार हजार रुपयांची आर्थिक मदत पाठवाली व पुढील कामास शुभेच्छा दिल्या.   संपत देसाई असोत ! की कासम शेख ! या पूर्वी या लोकांची आम्हास ओळखही नव्हती तरीही दुसऱ्या गावातील मुलांच्या शिक्षणासाठी... एका चांगल्या प्रयत्नासाठी या मान्यवरांनी कोणतीही मागणी न करता स्वच्छेने योगदान दिले!      *आज आपल्या महाराष्ट्रात महात्मा फुले, क्रांतिज्योति सावित्री..शाहू महाराज निर्माण व्हावेत अशी स्थिती...अशी गरज नक्कीच नाही. मात्र आधुनिक काळात शिक्षणाला... विद्यार्थ्यांच्या उज्वल  भविष्यासाठी संपत देसाई, कासम शेख आपणासरखे विशाल हृदयी अन संवेनशील मनाची माणसे समाजात पदोपदी निर्माण व्हावीत ! ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाचे एक नवे पर्व उद्यास यावे ! हीच एक शिक्षणाचा वारकरी म्हणून ईश्वरचरणी प्रार्थना !*🙏🙏💐💐   _आपल्या दातृत्ववृत्तीस आणि संवेदनशील भावनेस सलाम ! आणि खुप खुप आभार !

----------------------------------******************************--------------------------------


14/03/2020, 21:59 - Sachin Desai 
 दिशा परिवर्तनाची !   एक उत्तुंग झेप शाळेच्या प्रगतीची !
🏣 चरण ४ थे
            इथे मोल ना दामाचे lमोती होतील घामाचे lसत्य शिवाहून सुंदर हे lसरस्वतीचे मंदीर हे l  आपणास कोणी जर विचारले..... शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ यांची कामे कोणती ? कर्तव्ये कोणती ?* तर नक्की आपण शासकीय परिपत्रके चाळून सांगू की.. बैठका घेणे,विकास आराखडा करणे, १००% पट नोंदणी करणे,आर्थिक निधि योग्य करणासाठी खर्च करणे, रजा मंजूर करणे, निर्लेखन करणे....इत्यादी अनेक कामांची आपण यादी करु ! पण जर मी असे म्हटले की, *"झाड़लोट करणे..खड्डे मारणे..रंगकाम करणे..बांधकाम करणे...बांधकामवर पाणी मारणे...साफसफाई करणे..कारागिरांच्या कामात मदत करणे...वेळ पडल्यास रात्री १० वाजेपर्यतही शाळेसाठी श्रमदान करणे..इत्यादी."* अशी चाकोरी बाहेरील कामे आहेत ! कदाचित ही शासनाच्या मार्गदर्शिकेत नाहीत कदाचित बहुतेक ठिकाणी पहवायास  मिळत नसतीलही पण गेले काही दिवस आम्ही पाहतो...आम्ही अनुभवतो आणि म्हणूनच गर्वाने आज सांगतो ! कोल्हापुर शाहरपासून साधारण ८० km दूर असणारी *भुदरगड तालुक्यातील 'बशाचामोळा'* ही आमची १ ते ४ पर्यत ची छोटीशी शाळा. १४ वर्षे  गळतीमुळे बंद अवस्थेत असणारी अतिशय विद्राव्य अवस्थेतील शाळा इमारत दुरुस्त करण्याचे शिवधनुष्य आम्ही २ महिन्यापूर्वी उचलले पण ते पेलण्याची खरी ताकद दिली ती शाळा समितीने, पालकांनी, ग्रामस्थांनी आणि गावातील तरुण मंडळांनी ! 'लोकसहभाग' हीच ग्रामीण शिक्षणाची खरी शक्ती असते !* आपली गरज..आपली समस्या.. *आपल्या भावना केवळ मेंदूशी नाही तर पालकांच्या हृदयाशी भिडल्या तर शाळा व समाज एक सयुंक्त परिवार होण्यास... एक ऊर्जा...एक कार्यशक्ति निर्माण  विलंब लागत नाही* आणि म्हणूनच आज महाराष्ट्रात आज कित्येक शाळांना सोनेरी दिवस येत आहेत. आज गेली २ महीने शाळा परिवर्तनासाठी ग्रामस्थ वर्ग सर्वशक्तिनीशी आमच्या सोबत आहे. जेम तेम ४०० ते ४५० लोकवस्तीचे आमचे गांव पण आर्थिक व वस्तुरूपाने २ लाख पेक्षाही अधिक निधी लोकांनी आतापर्यत देवू केली आहे मदतीचा ओघ अजूनही चालू आहे. ग्रामपंचायतनेही वित्त आयोगातील तब्बल 3 लाख निधी शैक्षणिक बाबीसाठी वळवला. *सर्वात विशेष बाब म्हणजे लोकांच्या सर्वस्व त्यागाचे श्रमदानाचे सोशल मीडिया वरील व्हिडिओ पाहून महाराष्ट्रातून जवळपास सर्व जिल्ह्यातील संवेदशील शिक्षक बांधवांच्या कडून, दानशूर व्यक्तीच्याकडून कोणत्याही आवाहनाशिवाय ऑनलाइन स्वरुपात हजारो रुपयांची मदत रोज जमा होत आहे. कोणतीही मागणी न करता महाराष्ट्राच्या कणाकणातुन एखादे छोटेसे व सुंदर ज्ञानविश्व निर्माण होण्याचे असे उदाहरण क्वचितच असेल !* आमच्या या परिवर्तनाच्या कार्यात गावातील लहान थोर सर्व मंडळींचा आम्हास साथ लाभला इतकेच काय गावातील स्थानिक शिक्षकांनीही शाळेच्या वेळेनंतर अनेक वेळा शालेय कामात हातभार लावला ! *सरतेशेवटी  सांगण्याचे एकच...आपण जिल्हा परिषद शाळेत काम करत असताना शासनाचे तोकडे अनुदान आपणास आपले उद्दिष्ट आपले स्वप्न साध्य करण्यास पुरेसे होणार नाही...लोकांशी निर्माण होणारा विश्वास,अनुबंध, आणि ऋणानुबंध हीच खरी आपली शक्ती आहे ! हीच खरी आपली ताकद आहे !

----------------------------------******************************--------------------------------

14/07/2020, 21:00 - Sachin Desai 
 दिशा परिवर्तनाची !   एक उत्तुंग झेप शाळेच्या प्रगतीची !
 *चरण ५ वे 
'नवदांपत्यांनी दिली सुंदर भेट, गावातील शाळा झाली आणखी ग्रेट !'
सौ. व श्री. मारुती संकपाळ यांनी कोरोना काळात साधेपणाने लग्न करुन गावातील शाळेच्या सुशोभीकरणास केले नऊ हजार रूपये  खर्च !      

            एखाद्या नवदांपत्यास त्याच्या विवाहशुभप्रसंगी आपण त्यांना भेट देऊन नवजीवनास शुभेच्छा देतो ! पण एखाद्या दांपत्याने भेट न स्वीकारता एखाद्या चांगल्या कार्यास मदत करुन आपणच आदर्श भेट दिली असेल तर ....! हो..! असेच एक आदर्श उदहारण घालून दिले आहे 'बशाचामोळा' या खेड्यातील श्री. मारुती मनोहर संकपाळ या युवकाने. कोरोनाच्या संकटामुळे मारुती यांना कोणासही निमंत्रण न देता साधेपणाने विवाह करावा लागला; *पण विवाहानंतर त्यांनी गावातील शाळेच्या विकासासाठी साठी नऊ हजार खर्च करुन शाळा सुशोभित केली. ज्यामधुन सर्व खिड़क्यांना उत्कृष्ट पडदे व त्यासाठी आवश्यक मटेरियल खरेदी केले. मारुती हा विद्या मंदिर बशाचामोळा या आमच्या शाळेचाच माजी विद्यार्थी. आम्हां दोन्ही शिक्षकांना येथे हजर होवून काहीच महीने झाले आहेत; त्यामुळे प्रत्यक्ष तो आमचा विद्यार्थी नसला तरी त्यापेक्षाही चांगले ऋणानुबंध त्याच्याशी या अल्पावधित निर्माण झालेत. नेहमी हसतमुख चेहऱ्याचा मारुती गावातील व शाळेच्या प्रत्येक चांगल्या कार्यात हिररिने भाग घेतो. *"सर शाळेच्या विकासात कधीही... काहीही अडचण किंवा गरज असेल आवर्जून  सांगा !'* हे त्याचे प्रत्येक भेटीक्षणीचे आपुकलीचे शब्द आम्हांस खूप काही सांगून जायचे... ! बळ द्यायचे ! विशेष म्हणजे या कोरोना काळात त्याचा जेंट्स पार्लरचा व्यवसाय मागील ४ महीने पूर्णपणे बंद होता. तरीही या आणीबाणीच्या काळात *आपण चिमुकल्यांच्या सेवार्थ केलेले सहकार्य आमच्यासाठी लाख मोलाचे आहे ! इतरासाठीही प्रेरणादायी आहे ! तुमचे सारखे युवक जर योग्य ठिकाणी मदतकार्य करण्यास पुढे आले तर नक्कीच सर्वसामान्यांची मूलंही चांगल्या वातावरणात शिकतील व पर्यायाने चांगली घड़तील ! आपल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत ! धन्यवाद !_

----------------------------------******************************--------------------------------

01/09/2020, 14:58 - Sachin Desail
 दिशा परिवर्तनाची !   एक उत्तुंग झेप शाळेच्या प्रगतीची !🏣 
चरण ६ वे
अन् ..गावकऱ्यानीच श्रमदानातून उभारले शाळेचे किचन शेड !
_धो धो ओतणारा पाऊस थांबेना...! लॉकडाऊन  संपेना..! मेस्त्री, कामगार कोणीच मिळेना...! मग काय, *"आम्हीच खोललं, उचलून नेलं,पाया रचला अन् उभारलही." 'लोकसहभाग' हाच आपल्या सर्व जिल्हा परिषद शाळांचे मुख्य बलस्थान आहे. याच शक्तीच्या विश्वासावर आणि आधारावर आम्ही शून्यातून एक छोटेसे नवे ज्ञानमंदिर उभारु शकलो. विद्या मंदिर बशाचामोळा या शाळेचा पूर्व इतिहास आपण सर्व जाणता; म्हणूनच ठामपणे स्वनुभवातून सांगावेसे वाटते !    आज अनेक शालेय समस्या सुटल्या तरी अजुनही काही प्रश्न अन् अडचणी शिल्लक आहेत. *मुख्य अडचण म्हणजे शाळेची जुनी इमारत व दुरुस्त केलेली इमारत यात जवळपास 700 ते 800 मी इतके अंतर आहे. भविष्यात प्रस्तावित नविन खोली मंजूरीनंतर दोन्ही इमारती एका आवारात आणता येतील; पण किचन शेड चे स्थलांतर करणे सध्या अत्यावश्यक होते.    जुन्या शाळेजवळील हे किचनशेड खुले करणे व नवीन शाळेच्या आवारात उभारणे अत्यावश्यक होते. *यासाठी मेस्त्रीची शोधाशोध सुरु झाली. लॉकडाऊन मुळे सर्व कामे ठप्प ! मग कोण या कामासाठी येणार ? सर्वजण शब्द देत पण प्रत्यक्षात कोण आलेच नाही ! त्यात मागील अनेक दिवस सात्यत्याने पड़णारा जोराचा पाऊस ! अडचणी वाढल्या खऱ्या ! पण ज्यांनी अनंत अडचणीचा सामना करत 6 महिन्यात ऎत्याहासिक परिवर्तन केले त्यांना ही गोष्ट कशी अशक्य वाटेल ?*       झाल तर मग...! गावकऱ्यानी स्वतः हातात आवश्यक साहित्य घेऊन स्वतः किचन खोली खोलण्यास सुरवात केली.....पावसाचा तडाका वाढतच होता. पाटगाव परिसरात कसा पाऊस असतो ठावुकच असेल ! तरी *गावातील 'दिनानाथ मेस्त्री' या युवकाच्या मदतीने सर्वानी मिळून किचन खोली खोलली. त्याचे सर्व साहित्य डोक्यावर उचलून 800 मी अंतर चालत दुसऱ्या इमारतीकड़े आणले. मोजमाप करुन पाया खोदला..रचला व शेवटी जसे होते तसे किचन शेड नवीन जागेवर उभारलेही !*    म्हणूनच वाटते, 'लोकसहभाग' हीच खरी आपली ताकद आहे ! मग तो आर्थिक असो की श्रामिक ! जनशक्ति जर आपल्या पाठीशी ठाम असेल तर कोणतीही अडचण पण विकासाची संधी बनते ! *ज्यांचे आजपर्यतचे असामान्य श्रमदान पाहून राज्यभरातून अनेक शिक्षकांनीही या शाळेस मदत पाठवली; त्यांनी पुनः अनोखे श्रमदान करुन या संकटसमयी शाळेचा अत्यावश्यक सुविधेचा स्वतःच प्रश्न सोडवला ! या पवित्र कार्यात श्रमिक योगदान देणाऱ्या सर्वाचे पुनः मनःपूर्वक आभार !*🙏🙏💐

----------------------------------******************************--------------------------------

1/09/2020, 14:58 -  सचिन देसाई 
 दिशा परिवर्तनाची !   एक उत्तुंग झेप शाळेच्या प्रगतीची !
🏣 *चरण ७ वे
*'बालरंगमंच'..... एक देखणं स्वप्न जेव्हा साकारते मैत्रीच्या धाग्यातून !
 *कै.जी.जी. देसाई सर (मिणचे खुर्द) यांचे स्मरणार्थ विद्या मंदिर बशाचामोळा शाळेच्या प्रांगणात भव्य 'व्यासपीठ' ची उभारणी !
*आमचे जीवलग मित्र श्री. राहुल गणपतराव देसाई यांचे शाळा परिवर्तनाच्या कार्यात एक मौल्यवान योगदान !*▪️ *कोरोनाच्या संघर्षमय काळात लोकांच्या श्रमदानाच्याच्या जोरावर ही मैत्रीपूर्ण वास्तू भेट कशी आकारास आली ? १०० दिवसांच्या प्रवासाची एक प्रेरणादायी यशोगाथा ! आमच्या विद्या मंदिर बशाचामोळा (ता.भुदरगड) या शाळेचा आजखेर संघर्षमय आणि प्रेरक इतिहास *'दिशा परिवर्तनाची' या वेबसिरीज च्या माध्यमातून* आपणासमोर मांडत आलो. पण या प्रवासातील या सातव्या चरणाचे सादरीकरण करताना आज विशेष आनंद होत आहे.... कारण या इतिहासातील हे नक्कीच एक सोनेरी पान आहे, ज्याला मैत्रीच्या सुवर्ण नात्याची किनार आहे !  कित्येक वर्षे एका भयावह स्थितीत राहिलेले शालेय प्रांगण आज दिमाखदार झालेले पाहून कोणाचेही नेत्र सुखवल्या शिवाय राहत नाहीत. *या देखण्या वास्तू उभारणी मागील खरे श्रेय जाते श्री. राहुल गणपतराव देसाई (मिणचे खुर्द) यांना. राहुल हा माझा सर्वात जिवलग मित्र आज तो पुणे येथे सॉफ्टवेअर कंपनीत उच्च पदावर काम करतो. आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ माझ्या कार्यरत शाळेसाठी एक भव्य व्यासपीठ उभारणीसाठी योगदान देऊन एक कल्पित स्वप्न सत्यात उतरण्यास मोलाची साथ दिली.  खरे पाहता या 'बालरंगमंच' सुरवात मागील शैक्षणिक सत्राच्या शेवटीच झाली होती. *विशेष म्हणजे फाऊंडेशन पर्यतचे काम फ़क्त ग्रामस्थांच्या श्रमदानातून झाले. पण वेल्डिंग,पेंटिंग, फर्शी आदी कामासाठी विशेष कौशल्य असणारे कारागिर आवश्यक होते. त्यात कोरोनाचे संकट ओढवाले अन् १०० दिवसांच्या प्रवसाअंती हे काम पूर्णत्वाकडे आले. विद्यार्थांना जसे वातावरण उपलब्ध होईल तसा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडत असतो.* 'मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एखादे छोटे आणि सुंदर व्यासपीठ असावे'... हे एक स्वप्न मित्राच्या योगदानातून साकार झाले. "राहुल, या सत्कार्यात तू दिलेली भेट आम्हास मौल्यवान आहेच; पण मित्राच्या कोणत्याही कार्यात समर्पकवृत्तीने सहभागी होणारा सखा या आयुष्यात भेटला ही ईश्वराकडून मला प्राप्त झालेली त्याहुन अनमोल भेट आहे "* पुनः माझ्या कडून, माझे सहकारी श्री. दिग्विजय कोटकर सर, शाळा समिती व समस्त ग्रामस्थ बशाचामोळा यांचेकडून आपले मनःपूर्वक आभार !
----------------------------------******************************--------------------------------

01/10/2020, 20:19 - Sachin Desai 'शाळा बंद पण विकास आहे !
'विद्या मंदिर बशाचामोळा,ता. भुदरगड जि.कोल्हापूर       
*दिशा परिवर्तनाची !*
 *महत्वपुर्ण चरण 8️⃣  वे
      💧◼️ *स्वर्गीय तुकाराम शंकर पाटील यांचे स्मरणार्थ 'अमृतालय' पेयजल सुविधा साकार !*◼️ *आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ श्री. सुनिल तुकाराम पाटील यांनी शाळेतील मुलांच्यासाठी उभारली एक जीवनावश्यक सुविधा !*◼️ *एक हजार लीटर पाण्याची टाकी,त्यासाठी बांधकाम,टाइल्स,प्लम्बिंग, उत्कृष्ठ  छप्पर यासाठी तब्बल 23 हजार रूपये खर्चून केले 'एक छोटेसे अन् सुंदर जलकुंभ' निर्माण !
                             _"गावातील शाळाही आपलेच एक दुसरे घर आहे ! आपलेच एक दुसरे मंदिर आहे !"  ही प्रांजळ भावना ज्यावेळी शाळा समिती सदस्य व ग्रामस्थ यांच्यात निर्माण होते तेव्हा शाळेतील उणीवा, अडचणीही  अगदी घरच्या अडचणीप्रमाणेच आपुलकीच्या आणि कर्तव्याच्या जाणीवेतून सहजपणे दूर होतात. असाच काहीसा आदर्श घालून दिला शा.व्य.समितीचे सदस्य व गावातील एक प्रतिष्ठीत नागरिक मा.सुनिल तुकाराम पाटील यांनी._         _सुनिल भाऊ म्हणजे शाळेबद्दल नेहमीच घराप्रमाणे स्नेहभाव बाळगणारे... 'कमी तिथे आम्ही' भूमिका घेणारे व्यक्तित्व... ज्यावेळी शाळेत हजर झालो त्यावेळी शाळेत खुर्च्या कमी आहेत सांगताच, स्वतःहुन खुर्च्या पाठवणारे सुनील भाऊ... शाळेत लाइट नाही कळताच लगेच स्वतः व्यवस्था करुन देणारे म्हणजे  सुनिल भाऊ... पाण्यासाठी 1 लीटर टाकीची देणगी देण्यास कोण इच्छुक आहे का ? या सभेतील प्रश्नाला पहिला होकार देणारे आमचे सुनिल भाऊ नेहमीच  प्रत्येक कामात आधारवड राहिले आहेत. आमच्याप्रमाणे या गावात शिक्षक म्हणून काम केलेल्या आजअखेरच्या प्रत्येक गुरुजणांचे या कुटुंबाशी चांगले स्नेहबंध राहिले आहेत. चांगल्या विचार आणि संस्कारांची ओळख नेहमीच त्यांच्या व बंधू श्री. विजय पाटील यांच्याही सहवासातून जाणवते. ही विचारांची व संस्कारांची शिदोरी ज्यांच्याकडून लाभली...ज्यांनी खऱ्या अर्थाने घडवले ते त्यांचे आईवडील अकाली निधनामुळे आज दुर्देवाने हयात नाहीत. मात्र या त्यांचे स्मरण,आदरभाव व  विचारांचा वारसा आजही त्यांच्याठायी जाणवतो. या आपल्या पित्यांच्या स्मरणार्थ सुनिल भाऊनी गावातील शाळेसाठी *23 हजार खर्च करुण *'अमृतालय'* ही अत्यावश्यक पेजलसुविधा उभारुन शाळा विकासात मोठे योगदान दिले. कित्येक वर्षे अपुरी असणारी महत्वाची गरज पूर्ण केली. या लॉकडाऊन काळात हे काम पूर्ण झाले खरे; पण *या छोट्या कामासाठीही खुप संघर्ष करावा लागला.  एकतर हे पावसाळयाचे दिवस. या कामतही बांधकाम करणारा, प्लम्बिंग करणारा, फर्शी लावणारा, वेल्डिंग करणारा, फलक साठी पेंटिंग करणारा अशी भिन्न कारागिर या अपत्ती काळात शोधून तालुक्याच्या टोकाशी असणाऱ्या या गावी आणून काम पूर्ण करायचे होते. शिवाय आवश्यक मटेरियलची दुकाने क्वचित शासन परवानगीने उघडत तरीही याचा सामना करत, मार्ग काढत काही दिवसापूर्वी काम पूर्ण केले. शाळा समितीने आपली शेतीची कामे बाजूला ठेवून सर्व प्रकारचे श्रमदान या कामात केले. माझ्या बालमित्रानी देखील मैत्रीदिनाच्या दिवशी एक दिवस श्रमदान करुन पाईपलाइनसाठी भरपावसात खुदाई करुन जोडणी करुण ग्रामपंचायतचे पाणी या टाकीपर्यत आणले. शाळेच्या विकासपर्वातील व अत्यावश्यक सुविधेमधील एक महत्वपुर्ण टप्पा आम्ही या आपत्तीकाळातही पूर्ण करु शकलो. यासाठी दातृत्वाची सावली देणाऱ्या श्री. सुनिल पाटील यांच्या परिवाराचे, शिवाय श्रमदानाची साथ देणाऱ्या सर्वाचे आम्ही ऋणी आहोत ! धन्यवाद !


----------------------------------******************************--------------------------------


*15/02 /2021 
✍️ Sachin Desai
         Thankful Lines| About 'Today's Real Supporter| Constable Pandurang D. Patil |* *असा उभारला...तो ध्वजस्तंभ*     
           साधारण 1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल... फेब्रुवारी मधील 15 तारीखच असेल; पण साल होते 2020. *त्यावेळी आम्ही शाळेच्या लोकसहभाग पर्वास नुकताच प्रारंभ केला होता. 10 ते 5 शाळा झालेवर लोकसहभागासाठी रात्री समिती सोबत प्रत्येक ग्रामस्थांच्या घरी जावून भेटायचे व मिळेल ती मदत स्विकारुन, पुढे जायचे ! अश्याच भेटी प्रसंगी कोणाकडून तरी कानावर पडले, "पांडुरंग पाटील पोलीस परवाच सुट्टीवर आले आहेत त्यांना भेटा CRPF मध्ये नोकरीला आहेत नक्कीच चांगली मदत मिळेल." क्षणाचाही विलंब न लावता पाटील यांच्या घराकडे आमचा मोर्चा वळला, कारण त्यांची सुट्टी किती दिवसांची आहे, हे माहित नव्हते. घरी जावून प्रत्यक्ष भेट घेतली व शाळेच्या चाललेल्या कामकाजाचा वृत्तांत सांगितला व सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. कॉन्स्टेबल पाटील यांनी निसंकोच होकार दिला व भेट सार्थक झालेचे समाधान सोबत घेवून बाहेर पडलो. योगायोगाने दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 फेब्रु रोजी ग्रामस्थांनी माझ्या वाढदिवसाची गोपनीयतेने तयारी करुन शाळेतच सेलेब्रेशन करुन सुखद धक्का दिला. यावेळी श्री. पांडुरंग पाटील ही उपस्थित होते त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन सर्वांच्या समोर सांगितले की, "शाळेसाठी मी कोणतीही आवश्यक मदत करायला तयार आहे आपण सर्वांनी कोणताही गरजेचा योग्य पर्याय सुचवावा."   देशाच्या संरक्षण खात्यात काम करणाऱ्या या सैनिकास कोणता पर्याय सुचवावा ? जो करण्यास या दात्याला अभिमान वाटेल व एक दिमाखदार वास्तूही शाळेत आकारास येईल, असा प्रश्न सर्वासमोर आला... सरते शेवटी ध्वजस्तंभ उभारणी हाच पर्याय सर्वात योग्य ठरेल यावर आमचे सर्वांचे एकमत झाले. सदर अपेक्षित विषय घेवून आम्ही श्री. पांडुरंग पाटील यांच्या घरी गेलो आणि ध्वजस्तंभ उभरणीचा प्रस्ताव समोर ठेवला. पांडुरंग पाटील यांना हा विषय खुप भावला आणि त्यांनी योग्य वाटेल असा ध्वजस्तंभ बांधून देण्याची जबाबदारी स्विकारली. ही चर्चा चालू असताना एक प्रश्न मात्र पांडुरंग पाटील व माझ्या मनात सारखा खुणावत होता तो म्हणजे,"आम्ही नक्की यापूर्वी कधीतरी भेटलोय आणि चांगलेच ओळखतो." शेवटी पांडुरंग यांच्या कडूनच प्रश्न आला," तुम्ही 11 वी ला के.एच.कॉलेज, गारगोटी येथे होता का ?" मी तात्काळ ...हो ! म्हटले आणि आमचे दोघांचे कोड़ेही सुटले...!  खरे तर पांडुरंग हे माझे कॉलेजचे वर्गमित्र पण तब्बल 19 वर्षानंतर अशी अनोख्या विषयातून गाठ पडल्यावर एकमेकांना लवकर ओळखू शकलो नाही. तिसऱ्या भेटित जुनी ओळख पटली. आमचा आनंद द्विगुणित झाला. शिवाय एका दिमाखदार कार्यासही आरंभ झाला.  ज्या ठिकाणी आज ध्वजस्तंभ उभा आहे ती जागा.. तो शाळा परिसर या वावर व वापर नसलेने प्रदीर्घ काळात भयावह झाला होता. ही झाडी व झांजड काढ़ताना जोखमीची कामे पांडुरंग यांचे वडील ज्ञानदेव पाटील यांनी केली होती.तिरंग्याचा व शाळेची शान वाढेल असा स्तंभ उभारण्याचे कार्य फेब्रुवारी अखेरीस सुरु झाले.  नियोजित वैशिष्ठपूर्ण रचनेनुसार वैविध्यपूर्ण बांधकाम, स्टील वेल्डिंग यानुसार योग्य कारागिरांची मदत घेत कोरोना संकटाशी चार हात करत कार्य पूर्णत्वास नेले. स्टील चे मटेरियल, फर्शीवरील कोरीव डिजाइन अशी कामे शहरी भागातून करुन आणावी लागलीत. ड्यूटीवर हजर झालेवर राहिलेल्या कामाचे खर्च बिल श्री. पांडुरंग पाटील यांनी ऑनलाइन पाठवून दिले. याचे प्रथम ध्वजारोहण श्री. पांडुरंग पाटील यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते मात्र त्यांना सुट्टी न भेटलेने 15 ऑगस्ट रोजी त्यांचे वडील ज्ञानदेव पाटील ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मात्र मागील महिन्यात 26 जानेवारी 2021ला ते योगायोगाने सुट्टीवर गावी आले असलेने त्यांना ध्वजारोहणाचा मान शाळेकडून देण्यात आला. केवळ 20 पटाच्या दुर्गम भागात वसलेल्या खेड्यातील शाळेत असा भव्य ध्वजस्तंभ क्वचितच् पाहण्यास मिळेल. तिरंग्याचा मान सर्वश्रेष्ठ आहे आणि तो जपण्याचे भाग्य श्री. पांडुरंग पाटील यांच्यामुळे आम्हास प्राप्त झाला. याशिवाय गावात यापासूनच एक मोठे विकासकार्य हाती घेण्याचे लाकसहभाग पर्व सुरु झाले ते आजअखेर अखंडित चालूच आहे.* या कार्यास श्री.पांडुरंग पाटील यांना तब्बल 25 हजार रूपये खर्च आला. शिवाय शाळा व्यवस्थापन समिती यांचे व ग्रामस्थांचेही मोलाचे श्रमदान लाभले. या ध्वजाचा राज्यातील अनेक शाळांनी नमुनापर आदर्श घेऊन उभारणी केली. नुकतेच सातारा जिल्ह्यात अस्वलेवाडी येथे असा ध्वजस्तंभ उभारला गेला आहे.  या विकासकार्यात आणि या प्रवासात सर्व मित्रपरिवाराची मोठी साथ मिळाली. योगायोगाने पांडुरंग यांचाही एक मित्र आणि गावकरी म्हणून पाठिंबा मिळाला. देशाचे संरक्षण करण्याचे पवित्र कार्य करत आपण गावातील शिक्षणासाठी दिलेले योगदान हे देखील एक देशकार्यच आहे !  आज आखेरच्या आपल्या देशसेवेबद्दल, योगदानाबद्दल आणि त्यागाबद्दल आपणास मानाचा मुजरा ! सलाम ! जय हिंद !

----------------------------------******************************--------------------------------