सुस्वागतम...माझ्या या शैक्षणिक ब्लॉगवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे......... WEL-COME ON MY BLOG .......

Friday, 14 October 2016

वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषवाक्ये व कविता ....

* घोषवाक्ये*
➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖
*संकलन-लक्ष्मीकांत ईडलवार सर*
*सदस्य-शैक्ष.विचारधारा समूह*
➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖
 वाचाल तर वाचाल,
       शिकाल तर टिकाल
 जिथे जिथे दिसते पुस्तक,
       तिथे व्हावे नतमस्तक
 जिथे पुस्तकांचा साठा,
       समृद्धीचा नाही तोटा
 वाचन करता मिळते ज्ञान,
       उंचावते जीवनमान
 पुस्तकांशी करता मैत्री,
       ज्ञानाची मिळते खात्री
 वाचनाने समृद्ध होते मती,
       मिळते आमच्या विकासाला गती
 ग्रंथ हे आपले गुरु,
       वाचनासाठी हाती धरू
 वाचन करा वाचन करा,
       हाच खरा ज्ञानाचा झरा
 वाचनालयाला देऊ आकार,
       कलामांचे स्वप्न करू साकार
 एक एक वाचू पुस्तक,
       गर्वोन्नत होईल मस्तक
 वाचनसंस्कृती घरोघरी,
       तिथे फुले ज्ञानपंढरी
 वाचनाचा जपा नाद,
       ज्ञानाचा नको उन्माद
 वाचता वाचता मिळते ज्ञान,
      अनुभव हाच गुरु महान
 पुस्तके वाचून मिळते ज्ञान,
      ज्ञानासह समाजाचे भान


कविता 

*वसा वाचनाचा*
वाचनास खुल्या ह्या दाही दिशा
वाचनाचा मनाशी घ्यावा वसा
तुम्ही वाचा गाणी ,गोष्टी किती
आणि वाचून जाणा ही शिवनीती
वाचनाने जपूया आपली संस्कृती
प्रेरणा घेऊनी चालवा वारसा।
वाचनाचा मनाशी घ्यावा वसा।।
वाचा दैनिक ,मासिक ,विनोदी कथा
आणि नाजूक ,हळव्या आत्मकथा
आसवे दोन ढाळा वाचूनी व्यथा
वाचूनी ज्ञान मिळवा पसा पसा।
वाचनाचा मनाशी घ्यावा वसा।।
जागवा चेतना वाचा कारगील
चेतवा वाचनास प्रत्येक मूल
वाचूनी पेटवा अर्धी विझलेली चूल
वाचूनी बनावे ज्ञानरुपी कवडसा
वाचनाचा मनाशी घ्यावा वसा।।
कधी वाचा अंगाई
कधी वाचा हो आई
कधी वाचा संताची पुण्याई
वाचूनी सारे उमटवूया ठसा।
वाचनाचा मनाशी घ्यावा वसा।।
वाचा कुराण, बायबल आणि गीता
वाचा ऐक्य समता नि बंधूता
वाचूनी नांदवूया समानता
पुस्तके नीतीमूल्यांचा आरसा
वाचनाचा मनाशी घ्यावा वसा।
करु संकल्प वाचन प्रेरणादिनी
जरी वाचन व्हाट्सप हाईकवरुनी
वाचूनी मिळवूया ज्ञानसंजीवनी
कलामांना मुजरा सरलाचा असा।।
वाचनाचा मनाशी घ्यावा वसा
          *✍शब्दांकन✍*
*सौ.सरला राहुल साळूंखे,जि.प.शाळा कोठडा,ता.नवापूर जि.नंदुरबार*

No comments:

Post a Comment